आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज पुष्टी केली आहे की पुढील वर्षी होणार्‍या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाईल, तर २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन कोण करेल. या संदर्भातील घोषणा आयसीसीने केली आहे. आयसीसीने या संदर्भातील घोषणा करताना अशी माहिती दिली आहे की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाईल, तर २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन लॉर्ड्सवर केले जाईल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल? न्यूझीलंडकडून कसोटीचे जेतेपद कोणता संघ हिसकावून घेऊ शकेल?  यावर अंतिम फेरीची घोडदौड सुरू असल्यानं अद्याप निर्णय झालेला नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्वच देशांचे कसोटी संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, अंतिम सामना हा कुठं होणार हे निश्चित झालं आहे. २०२३ चा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

यासोबतच २०२४ ते २०४७ या कालावधीतील पुरूष आणि महिलांसाठीच्या भावी दौऱ्याच्या कार्यक्रमालाही मान्यता देण्यात आली आहे. आयसीसीची वार्षिक परिषद सोमवार २५ जुलै आणि मंगळवार २६ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक प्रमुख निर्णयांची औपचारिक घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचा   :   शेवटच्या षटकांमधील भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली चिंता

२०१९ मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सध्याच्या सायकलचे ठिकाण अंतिम फेरीसाठी दोन प्रतिष्ठित मैदानांची पुष्टी करताना त्यांना आनंद होत आहे, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी सांगितले. आयसीसीने प्रकाशित केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की, “पुढील वर्षी ओव्हल येथे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यात इतका समृद्ध वारसा आणि अद्भुत वातावरण आहे,  हवामान आणि जागतिक वेळेचा विचार करता हे ठिकाण अगदी योग्य आहे.”

हेही वाचा   :   लज्जास्पद!! एशियाड पदक विजेती पूवम्मा हिवर उत्तेजक चाचणीत अडकल्याने दोन वर्षांची बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या वर्षी साउथॅम्प्टनमध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील अंतिम सामना एक मनोरंजक सामना होता आणि मला खात्री आहे की जगाने त्याचा आनंद घेतला असेल. चाहते ओव्हल येथे पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहे.” आयसीसीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचेही आभार मानले आहेत.