बरेच जण नामी शक्कल लढवून आपला ५०वा वाढदिवस साजरा करत असतात. तर काही जण वयाचे अर्धशतक हे कुटुंबीयांसोबत जुन्या आठवणींसह साजरे करतात. पण इंग्लंडचे मसाजिस्ट पॉल स्मॉल यांना संघातील खेळाडूंनी बुधवारी आगळ्यावेगळ्या प्रकारे वाढदिवसाची भेट दिली. एरव्ही, खेळाडूंना लागले, खरचटले किंवा दुखले तर पॉल बर्फाची पिशवी घेऊन धावत जायचे. पण जो हार्ट, ग्लेन जॉन्सन आणि स्टीव्हन गेरार्ड या इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी पॉल यांना एका खुर्चीवर बसवून त्यांचे हात, पाय बांधून घेतले. त्यानंतर बर्फाने भरलेल्या बाथ टबमध्ये बसवून ‘हॅप्पी बर्थ डे’ म्हणत त्याच पाण्याने त्यांना अंघोळ घातली. डॅनियल स्टरिजने या क्षणाचे चित्रीकरण केले. रात्री हे चित्रीकरण पाहताना हसून हसून सर्व खेळाडूंच्या पोटात दुखू लागले होते.
कैफ विश्वचषकाचा..
कोलकाता म्हणजे फुटबॉलवर सर्वात जास्त प्रेम करणारं भारतातील शहर. फिफा विश्वचषकाचा कैफ या शहरात सध्या पदोपदी जाणवतो आहे. स्टेडियम आणि फिफा विश्वचषक यांची तयार केलेली ही नयनरम्य प्रतिकृती सहजपणे लक्ष वेधते.