scorecardresearch

Premium

IND vs AUS Final: रोहित शर्माच्या निर्णयावर गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “सूर्यकुमारवर विश्वास नव्हता तर संघात…”

IND vs AUS Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवला ७व्या क्रमांकावर पाठवण्याच्या रोहित शर्माच्या निर्णयावर गौतम गंभीरने टीका केली आहे.

If there was no trust in Surya someone else should have been taken Gautam Gambhir lashed out at Rohit Sharma
अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवला ७व्या क्रमांकावर पाठवण्याच्या रोहित शर्माच्या निर्णयावर गौतम गंभीरने टीका केली.

India vs Australia ICC World Cup Final 2023: सामन्यापूर्वी सलग १० सामने जिंकून फेव्हरिट असतानाही भारताने विश्वचषक फायनल का गमावली, यावर अनेक चर्चा होतील. रिकी पाँटिंग, नासिर हुसेन, हरभजन सिंग यांसारख्या काही दिग्गज क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की, अहमदाबादची खेळपट्टी ही खराब होती. दुसरीकडे, सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या क्रिकेटपटूंना वाटते की के.एल. राहुल आणि विराट कोहली यांच्यातील ६७ धावांच्या संथ भागीदारीमुळे भारताने सामना गमावला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवला ७व्या क्रमांकावर पाठवण्याच्या रोहित शर्माच्या निर्णयावर गौतम गंभीर आणि वसीम अक्रम यांनी टीका केली आहे.

पॅट कमिन्सने रविवारी संध्याकाळी कोहलीच्या बहुमोल विकेट घेत अहमदाबादच्या प्रेक्षकांना शांत केल्यानंतर, सूर्यकुमार यादव ६व्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी हीच क्रमवारी होती. पण अंतिम फेरीत संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला सूर्यकुमारच्या पुढे पाठवण्याचा निर्णय घेतला, ज्याची गेल्या महिन्यात हार्दिक पांड्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर विशेषज्ञ फलंदाज म्हणून निवड झाली होती.

aiden markram
World Cup 2023, SA vs SL: वेगवान शतकवीर एडन मारक्रम जेव्हा रागाच्या भरात हात आपटून झाला होता जखमी, मागितली होती माफी
England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
ICC World Cup 2023: World Cup ticket increased KL Rahul's worries know why he said I will not answer to anyone
World Cup 2023: विश्वचषकाच्या तिकिटांमुळे के.एल. राहुलची चिंता वाढली; म्हणाला, “मी कोणालाच उत्तर देणार नाही…”
Now no one can side on him of the team while I am their Captain Rohit Sharma said about Kuldeep Yadav
Rohit Sharma: “मी जोपर्यंत कर्णधार आहे तू संघाबाहेर…” कुलदीप यादवबद्दल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितचे सूचक विधान

हेही वाचा: IND vs AUS: “१०७ चेंडूत फक्त ६६ धावा करून ५० षटके…”,पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने राहुलच्या फलंदाजीवर केले प्रश्न उपस्थित

२०११चा विश्वचषक विजेता गौतम गंभीर म्हणाला, “सूर्यकुमार यादवच्या आधी जडेजाला का पाठवण्यात आले हे मला समजत नाही. त्याला ७ नंबरवर का पाठवले? माझ्या मते हा अजिबात योग्य निर्णय नव्हता.” अक्रम एका स्पोर्ट्स टीव्ही कार्यक्रमात म्हणाला, “मला सूर्याबाबत म्हणायचे आहे की, तो तिथे पूर्णपणे फलंदाज म्हणून खेळत आहे. हार्दिक जर संघात असता तर मला त्याची चाल समजू शकली असती. मात्र, जडेजाला आधी पाठवणे हे न समजण्यापलीकडे आहे.”

भारताच्या माजी सलामीवीर गंभीरने पुढे प्रश्न केला की, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा नंबरचा फलंदाज म्हणून सूर्यकुमारच्या क्षमतेबद्दल संघ व्यवस्थापनाला कधीच विश्वास नव्हता.” गंभीरला असेही वाटते की, “जर सूर्यकुमारला ६व्या क्रमांकावर पाठवले असते तर त्याने बचावात्मक मानसिकतेमध्ये जाण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक आक्रमक क्रिकेटने खेळायला हवे होते, हे माहीत असतानाही फलंदाजी क्रमवारीत बदल का करण्यात आला? हे समजण्यापलीकडचे आहे. मागे एकही फलंदाज शिल्लक नाही, हे रोहितला माहिती नव्हते.”

हेही वाचा: IND vs AUS T20I: भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, ‘या’ स्टार सलामीवीर फलंदाजाने घेतली माघार

गंभीर पुढे म्हणाला, “कल्पना करा की के.एल. राहुल कोहलीबरोबर एका विशिष्ट पद्धतीने जर फलंदाजी करत असेल तर सूर्यकुमारला आत पाठवून त्याला आक्रमक क्रिकेट खेळायला सांगणे, त्याचे नैसर्गिक क्रिकेट खेळायला सांगणे अधिक अर्थपूर्ण आहे. कारण, तुमच्याकडे जडेजा अजूनही मागे आहे, असा विश्वास देता आला असता. सूर्यकुमारने घाई केली असे म्हणणे एखाद्या तज्ज्ञाला खूप सोपे आहे. पण खेळाडूची मानसिकता अशी असते अशावेळी की, जर तो बाद झाला तर पुढचा फलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, सिराज आणि कुलदीप असेल. त्यामुळे माझ्यानंतर एकही फलंदाज नाही. मात्र, पुढचा फलंदाज जडेजा आहे हे त्याला माहीत असते तर त्याची मानसिकता वेगळी असती. जर तुमचा सहाव्या क्रमांकावरील सूर्यकुमारवर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी निवड करायला हवी होती.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If there was no trust in suryakumar at number 6 then someone else should have been taken gautam gambhir angry at rohit sharmas decision avw

First published on: 21-11-2023 at 16:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×