Nasser Hussain looks at the year 2024 ahead for Virat and Babar : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यात तो यशस्वी ठरला. यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३५ सामन्यांच्या ३६ डावांमध्ये ६६.०६ च्या सरासरीने २०४८ धावा केल्या. ज्यामध्ये ८ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश होता. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमसाठी हे वर्ष काही खास राहिले नाही. आता या दोन स्टार खेळाडूबद्दल इंग्लंडचा माजी खेळाडू नासिर हुसेनने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता न आल्याने बाबरने कर्णधारपद गमावले. बॅटनेही त्याची कामगिरी काही खास नव्हती. ३५ सामन्यांच्या ३७ डावांमध्ये त्याने ३९.९७ च्या सरासरीने १३९९ धावा केल्या. त्याने ३ शतके आणि १० अर्धशतके केली. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने २०२४ संदर्भात कोहली आणि बाबरसाठी मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२४ हे दोन्ही खेळाडूंचे वर्ष खूप चांगले जाईल, असा त्याला विश्वास आहे.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी कुटुंबासह नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दुबईत दाखल, फोटो होतायत व्हायरल

नासिर हुसेनने विराट कोहलीला मेगा स्टार म्हटले –

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जारी केलेल्या व्हिडीओमध्ये नासिर हुसेनने विराट कोहलीला मेगा स्टार म्हटले आहे. तो म्हणाला की २०२३ आणि विश्वचषक कोहलीसाठी खूप चांगले होते. त्याने अनेक विक्रम मोडले, ज्याकडे लक्ष वेधले गेले. तो किती चमकदार फलंदाजी करतो याकडे कोणाचेच लक्ष नव्हते.

विराटच्या खेळात सुधारणा होताना दिसत आहे –

नासिर म्हणाला की, तांत्रिकदृष्ट्या त्याने विराटला अशी फलंदाजी कधीच पाहिली नव्हती. बॅटचा आवाज, मुंबईत श्रीलंकेविरुद्धची ती खेळी. तो अशा ५ डावांची नावे देऊ शकतो, ज्यात कोहली उत्कृष्ट स्थितीत होता. विराट, भारत आणि विराटच्या चाहत्यांसाठी हे शुभ संकेत आहे. याचा अर्थ तो मानसिकदृष्ट्या चांगला आहे आणि त्याच्या खेळात सुधारणा होताना दिसत आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : कार अपघातानंतर एका वर्षाने पुनरागमनासाठी ऋषभ सज्ज, दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला भावनिक VIDEO

बाबर आझमबद्दल नासिर हुसैन काय म्हणाला?

बाबर आझमबाबत नासिर हुसेन म्हणाले की, बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात खूप तुलना आहे. बाबर आणि पाकिस्तानसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे, असे त्याला वाटते. त्याने कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील भार कमी झाला आहे. तो भरपूर धावा करून पाकिस्तानसाठी मोठे योगदान देऊ शकतो. पाकिस्तानला त्याच्याकडून धावा हव्या आहेत. टी-२० विश्वचषक कॅरेबियन भूमीवर होणार आहे. गेल्या वेळी हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. माजी कर्णधाराकडून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.