Sakshi Dhoni shared pictures of herself enjoying party : नवीन वर्ष सुरू होण्याआधी अनेक क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर पडतात, जिथे ते नवीन वर्षाची संध्याकाळ त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रांमध्ये साजरी करतात. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह दुबईला पोहोचला, जिथे तो नवीन वर्षाच्या आधी आनंद लुटताना दिसला. त्याची पत्नी साक्षी धोनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये फक्त धोनी आणि साक्षीच नाही तर क्रिती सेनन आणि नुपूर सेनन यांसारख्या अनेक सेलिब्रिटीही या पार्टीत उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

एमएस धोनी दुबईमध्ये पार्टी करताना दिसला –

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. जिथे ती नवीन वर्षाची पार्टी अगोदर होस्ट करत आहे. हा व्हिडिओ दुबईतील सर्फ कॅफेचा आहे, जिथे एमएस धोनी आधी त्याच्या मित्रांसोबत गेला होता आणि आता पुन्हा एकदा तो आपल्या मित्रांसोबत तिथे मजा करताना दिसत आहे. एमएस धोनीचा दुबईतील गायक अब्दू रोजिकसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे. याशिवाय, आणखी एका छायाचित्रात एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी माजी कर्णधाराच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. साक्षी पती धोनीच्या मांडीवर बसून पोज देत आहे

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल

काळ्या शर्ट आणि पँटमध्ये माही अप्रतिम दिसत आहे –

एमएस धोनीच्या लुकबद्दल बोलायचे झाले, तर तो ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये खूप डॅशिंग दिसत आहे. त्याने दाढीचा लूक स्वीकारला आहे आणि लांब केस आहेत. जर आपण साक्षी धोनीच्या लूकबद्दल बोलायचे, तर तिने एक अतिशय सुंदर ऑफ-व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये पफ स्लीव्हज आहेत आणि साक्षीने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. माही आणि तिच्या कुटुंबाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्याला ४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

हेही वाचा – IND vs SA : केपटाऊन कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सराव सत्रात ‘या’ खेळाडूला फलंदाजी करताना झाली दुखापत

एमएस धोनी लवकरच आयपीएलमध्ये खेळणार –

महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट पुनरागमनाबद्दल बोलायचे, तर यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने त्याला कायम ठेवले आणि त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणाही केली नाही. अशा परिस्थितीत तो या वर्षी मार्चमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी इंडियन प्रीमियर लीगचा १७वा सीझन खेळताना दिसणार आहे. गेल्या वर्षीच, सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.