यावर्षी आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र आशिया चषकाच्या आयोजनाबाबत सुरू असलेला वाद आता सुटताना दिसत नाही, कारण भारताने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानला ही स्पर्धा आपल्याच देशात आयोजित करायची आहे. परंतु एसीसीने आशिया चषक आयोजनासाठी श्रीलंका, बांगलादेश आणि यूएईला पर्याय म्हणून ठेवले होते. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट्टने या प्रकरणी आपली सूचना केली आहे. मात्र ती सूचना कितपत यशस्वी होईल सांगणे अवघड आहे.

आशिया चषक २०२३ बाबत सातत्याने बातम्या येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे यजमानपद आहे, पण भारताने पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बीसीसीआयच्या कठोर भूमिकेनंतर पीसीबीने या आशियाई स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल सादर केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील अशी चर्चा होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळही यावर सहमत नाही.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

हेही वाचा: IPL 2023: “रिंकू, यशस्वीला आत्ताच संधी द्या, नाहीतर…”, माजी फिरकीपटू हरभजन सिंगचा BCCIला मोलाचा सल्ला

इंग्लंडमध्ये आशिया चषक खेळवावा- सलमान बट्ट

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट्टने या संदर्भात आपली सूचना केली आहे. आशिया चषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्याबाबत सलमान बट्टने चिंता व्यक्त केली. “ही स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित केली जाऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुम्हाला हवे तितके पर्याय तुम्ही शोधू शकता. पण त्यांना काही अर्थ नाही.” पुढे बोलताना सलमान बट म्हणाला, “तुम्ही यामध्ये इंग्लंडचा समावेश करून युरो-आशिया चषक बनवू शकता, पीसीबीला त्याने सांगितले की तुम्ही हा पर्याय आशियाई क्रिकेट कौन्सिलपुढे ठेवावा. पूर्वी ऑस्ट्रेलिया-आशिया चषक व्हायचा त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी होत असे. यामध्ये तुम्ही आयर्लंड आणि नेदरलँड्सचाही समावेश करू शकता. ही स्पर्धा विश्वचषकासारखी असेल, कारण यात आशियातील सहा आणि युरोपमधील चार संघ सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा दहा संघांची असेल. ही विश्वचषकाची तालीम होऊ शकते.”

वास्तविक, पाकिस्तानी मिडियानुसार पीसीबीला हायब्रीड मॉडेलवर आशिया चषक २०२३ आयोजित करण्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंकेचा पाठिंबा मिळाला आहे. बीसीबी आणि एसएलसीने यावर कोणताही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेकडे (एसीसी) प्रस्ताव सादर केला आहे. आता एसीसीचे अध्यक्ष जय शाह, जे बीसीसीआयचे सचिव देखील आहेत, येत्या दोन दिवसांत या प्रस्तावाचे मूल्यांकन करतील. मात्र, बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी हलविण्यावर ठाम असल्याने भारत या स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतो.

हेही वाचा: IPL2023: जेव्हा संघाचे मालक प्रार्थना तेव्हा…; संजीव गोयंका मोहसीन खान-लखनऊसाठी प्रार्थना करताना दिसले, पाहा Video

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “मी हा प्रस्ताव पाहिला नाही, पण आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. ही स्पर्धा यूएईमध्ये न होता तटस्थ ठिकाणी खेळवली जावी, अशी आमची इच्छा आहे. तेथील उष्णतेमुळे आमच्या अधिक खेळाडूंना दुखापत होणे परवडणारे नाही. या स्पर्धेसाठी श्रीलंका सर्वोत्तम आहे. आतापर्यंत आम्ही बहिष्कार टाकण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. आधी परिस्थिती समजून घेऊ आणि नंतर निर्णय घेऊ.” आशिया चषक २०२३ची भारताशिवाय कल्पनाच करता येणार नाही.