बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दिल्लीत झालेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स निराश झाला आहे. त्यामुळे त्याने आपल्या संघातील फलंदाजांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

दिल्ली कसोटीतील पराभवानंतर पॅट कमिन्स म्हणाला, “पहिल्या डावात २६० धावा ही चांगली धावसंख्या आहे, असे मला वाटले. मुलांनी चांगली फलंदाजी केली, पण भारताने चांगली फलंदाजी केली. फक्त दोन भागीदारी आवश्यक आहेत आणि तुम्ही २६० धावांचे लक्ष्य सहज गाठता. डावाच्या ब्रेकपर्यंत सर्व काही ठीक होते, पण आम्ही खेळात पुढे होतो पण तरीही मागे पडलो हे खूपच निराशाजनक आहे. आम्हाला काय सुधारणा करता येईल याचा आढावा घ्यावा लागेल.”

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्वीपमध्ये बाद होत आहेत. याबद्दल बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, ”प्रत्येकजण आपल्या खेळावर नियंत्रण ठेवतो, काही चेंडूंवर तुमचे नाव लिहिलेले असते. पण शॉट सिलेक्शनचा विचार करायला हवा ना? दोन्ही डाव निराशाजनक होते, विशेषतः हा एक. आम्ही या डावात पुढे होतो, जे भारतात फारसे घडत नाही. हा पराभव दुखावणारा आहे.”

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले मन; चेतेश्वर पुजाराला दिली एक खास भेटवस्तू

दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी पहिल्या डावात २६३ धावा केल्या, ज्यात भारतीय संघही २६२ धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १ धावांची आघाडी मिळाली होती, मात्र दुसऱ्या डावात त्यांचा संपूर्ण संघ केवळ ११३ धावांवर आटोपला. या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने १२.१ षटकात केवळ ४२ धावा देत ७ विकेट घेतल्या, ज्यामुळे भारतीय संघाने सहज सामना जिंकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरी कसोटी इंदोरमध्ये होणार आहे

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ ते ५ मार्च दरम्यान इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा त्या मैदानावर कसोटीत १०० टक्के विजयाचा विक्रम आहे. येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंड आणि बांगलादेशचा पराभव केला. अशा स्थितीत इंदोरमध्ये विजयाची नोंद करून भारतीय संघ सलग दुस-यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिकीट मिळवण्याची शक्यता आहे.