भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दिल्ली कसोटीचा दुसरा दिवस विराट कोहलीच्या विकेटमुळे खूप चर्चेत होता. वास्तविक, नवोदित मॅथ्यू कुहनमनच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. अंपायर नितीन मेनन यांनी कोहलीला बाद घोषित केले, पण कोहलीने पंचांच्या निर्णयाला आव्हान देत रिव्ह्यू घेतला. कोहलीला माहित होते की चेंडू आधी त्याच्या बॅटला लागला होता, पण जेव्हा तिसऱ्या पंचाने रिप्ले पाहिला तेव्हा तो चेंडू पॅडला लागला की बॅटला हे ठरवू शकले नाही.

ज्यामुळे त्यांनी नितीन मेननच्या निर्णयासोबत जाऊन कोहलीला एलबीडब्ल्यू घोषित केले. थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर वाद सुरू झाला. ज्यावर क्रिकेटपंडितांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. दरम्यान, आता विरोधी संघाचा ऑफस्पिनर नॅथन लायन याचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये पंचांच्या निर्णयाचे लायनने कौतुक केले आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
sandeep sharma got emotional on unsold ipl 2024 auction after rr vs mi match
RR vs MI: “दोन वर्षांपूर्वी मला कोणी विकत घेतले नाही, पण…” मुंबई इंडियन्सच्या ५ विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने व्यक्त केली मनातील ‘ही’ भावना
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नॅथन लायन म्हणाला, ”मला वाटते हा योग्य निर्णय होता. हा निर्णय आपल्या बाजूने लागावा असे विराटला वाटले असावे, यात शंका नाही. पंचांना सलाम. अशा परिस्थितीत निर्णय घेणे कठीण आहे. निर्णय आमच्या बाजूने जावा म्हणून आम्ही गोलंदाज त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी हा निर्णय योग्यच ठरला.”

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १ गडी गमावून ६१ धावा केल्या. कांगारूंचा संघ आता भारतापेक्षा ६२ धावांनी पुढे आहे. मार्नस लाबुशेन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसह क्रीजवर उपस्थित आहे.

हेही वाचा – Harmanpreet Broke Rohit Record: हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारी बनली पहिली खेळाडू

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या २६३ धावांसमोर भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी अक्षर पटेलने ७४ धावांचे शानदार खेळी केली, तर माजी कर्णधार विराट कोहलीने वादग्रस्त पद्धतीने बाद होण्यापूर्वी शानदार ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने सर्वाधिक ५ बळी घेतले.

हेही वाचा – न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिका: इंग्लंड विजयाच्या उंबरठय़ावर

भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर किमान ऑस्ट्रेलियाला २२०-२३० धावांच्या आत गुंडळावे लागेल. दिल्लीची खेळपट्टी चौथ्या डावात फिरकी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे येथे फलंदाजी करणे भारतासाठी सोपे जाणार नाही.