IND vs AUS Match Highlights: आज, १९ नोव्हेंबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाशी झाला आहे. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर ७० धावांनी दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. तर प्रोटिजचा पराभव करून ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील अंतिम फेरी गाठणारी दुसरी टीम ठरली हाती. भारत न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यानंतर, अमिताभ बच्चन यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले होते की “जेव्हा मी सामना बघत नाही तेव्हा भारतीय क्रिकेट संघ नेहमीच जिंकतो.”

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टनंतर साहजिकच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बच्चन यांना तुम्ही आम्हाला खूप आवडता पण कृपया भारताचा अंतिम सामना बघू नका अशी विनंती केली होती. फक्त चाहत्यांनीच नव्हे तर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने सुद्धा या पोस्टवरून अभिषेक बच्चनला टॅग करत मजेशीर विनंती केली आहे. वसीम जाफरने बिग बींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, अभिषेक बच्चन तुला आता फक्त एकच काम आहे (अमिताभ बच्चन यांना सामना बघू देऊ नकोस). लोकांनी सुद्धा यावर भन्नाट कमेंट करत अभिषेक हातात पक्कड घेऊन घराचा वीज पुरवठा बंद करत असल्याचे मीम शेअर केले आहेत

हे ही वाचा<< IND Vs AUS मध्ये भारताने टॉस हरणं ठरणार फायद्याचं? ‘हा’ योगायोग भारतीयांसाठी आशेचा किरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माने षटकार- चौकारांसह दणदणीत सुरुवात केली, मात्र सामन्याच्या सुरवातीलाच शुबमन गिलने अवघ्या चार धावा करून आपली विकेट गमावली. पाठोपाठ रोहित शर्मा सुद्धा ४७ धावांवर बाद झाला. मागील दोन सामन्यांमध्ये धमाकेदार शतक करणाऱ्या श्रेयस अय्यरने सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. सध्या भारताची धावसंख्या अत्यंत संथ गतीने पुढे सरकताना दिसत आहे.