भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कांगारू संघाने २-१ च्या फरकाने मालिकाविजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यातील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारीने सर्वांचं लक्ष वेधलं. रोहित-विराटच्या नाबाद १६८ धावांच्या भागीदारीने अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहित-विराटचा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा होता, यादरम्यान ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरही रो-को ला अखेरचं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळताना पाहून भावूक झाले.

रोहित आणि विराट त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑस्ट्रेलियामधील अखेरच्या सामन्यात रोहित-विराटला खेळताना पाहून कॉमेंटेटर भावुक झाले होते.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी १६८ धावांची भागीदारी केली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती. रोहित शर्माने नाबाद १२१ धावा आणि विराट कोहलीने नाबाद ७४ धावा केल्या. सेन क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराट आणि रोहितला शेवटचं खेळताना पाहून त्या समालोचकाला रडू कोसळलं. दुसरे कॉमेंटेर रोहित-विराटच्या कामगिरीबद्दल कॉमेंट्री करत असतानाच मागे उभे राहत दुसरे कॉमेंटेटर मात्र भावुक झालेले पाहायला मिळाले.

रोहित शर्माला त्याच्या १२१ धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. तर मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून मालिकावीर पुरस्कारही रोहितला देण्यात आला. तर ७५ धावांची खेळी करत विराट कोहली हा भारतासाठी वनडे आणि टी-२० मध्ये एकत्रितपणे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि त्याने सचिन तेंडुलकरला या विक्रमात मागे टाकलं.

ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर रोहित-विराट पुन्हा मैदानावर केव्हा उतरणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा पाहण्यासाठी जवळजवळ एक महिना वाट पहावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रांची येथे होणार आहे. तर दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूर व तिसरा सामना ६ डिसेंबरला विशाखापट्ट्णममध्ये खेळवला जाईल.