टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या दौऱ्याची सुरूवात वन डे आणि टी २० मालिकेसाठी होणार आहे तर कसोटी मालिकेने दौऱ्याचा शेवट होणार आहे. टीम इंडिया बुधवारी युएईतूनच थेट ऑस्ट्रेलियात रवाना झाली. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका म्हटली की ‘माईंड-गेम्स’, खेळाडूंकडून खळबळजनक वक्तव्य या गोष्टी काही क्रिकेट चाहत्यांना नवीन नाहीत. पण यावेळी तिसऱ्याच संघाच्या एका माजी कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर वरचढ ठरेल असं मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला सहज मात देईल असं ट्विट केलं आहे. “ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ३ कसोटी सामन्यांसाठी विराट नसणार. पहिल्यांदाच बाबा होणाऱ्या विराटचा पालकत्व रजा घेण्याचा निर्णय अगदी अचूक आहे. पण याचाच अर्थ (विराट नसल्यामुळे) ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका अगदी सहज जिंकेल”, असं ट्विट वॉनने केलं आहे.

टीम इंडिया कसोटी संघ-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ-

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड, डेव्हिड वॉर्नर

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरी कसोटी – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथी कसोटी – १५ ते १९ जानेवारी – गॅबा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus no virat kohli so australia can easily beat team india in test series tweets michael vaughan vjb
First published on: 12-11-2020 at 12:50 IST