भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. आज या पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १३३.५ षटकांत सर्वबाद ४०४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आश्विनने अर्धशतके झळकावली. ज्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.

बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिल (२०) आणि केएल राहुल (२२) बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारने शानदार खेळी साकारताना भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु अवघ्या १० धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने २०३ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. त्याचबरोबर ऋषभ पंतने ४६ धावांचे योगदान दिले.

Delhi Capitals vs Gujarat Titans Updates in Marathi
DC vs GT : ऋषभ-अक्षरच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय, मिलरचे अर्धशतक ठरले व्यर्थ
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights in Marathi
PBKS vs MI Highlights, IPL 2024 : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय, आशुतोष शर्माची वादळी खेळी ठरली व्यर्थ
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

हेही वाचा – FIFA WC 2022: अंतिम ध्येयापासून एक पाऊल दूर, अर्जेंटिना आणि फ्रान्सचा कसा होता विश्वचषकातील प्रवास, जाणून घ्या

श्रेयस अय्यरने बाद होण्यापूर्वी ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १९२ चेंडूचा सामना करताना १० चौकार लगावले. त्याचा इबादोत हुसेनने त्रिफळा उडवला. त्यानंतर आर आश्विनने भारतीय संघाची सूत्र हाती घेताना कुलदीप यादवसोबत आठव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा – केएल राहुल-अथियाचं लग्न जानेवारी २०२३मध्ये होणार? लेकीच्या लग्नाच्या तारखेबद्दल सुनील शेट्टी म्हणाले…

या दरम्यान आश्विनने ११३ चेंडूचा सामना करताना, दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने नाबाद ५८ धावा केल्या. बांगलादेश संघाकडून गोलंदाजी करताना तैजुल इस्लाम आणि मेहदी हसनने प्रत्येकी सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर खालीद अहमद आणि इबादोत हुसेनने प्रत्येकी १ विकेट घेतली.