virat kohli bhangra dance video: ‘एकही मारा लेकीन सॉलीड मारा’ हा हिंदी चित्रपटांमधील संवाद आठवावा अशीच काहीशी फलंदाजी आज भारताच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी इशान किशन आणि विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये केली. सुंदर फटकेबाजीचा नजराणा पेश करत या दोघांनी चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान इशानने त्याचं द्विशतक आणि विराटने त्याचं ७२ वं शतकं साजरं केलं. विशेष म्हणजे इशानने २०० धावा केल्यानंतर विराटनेच मैदानात भांगडा केल्याचं मजेदार दृष्य पहायला मिळालं.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा जखमी झाल्याने त्याच्या जागी आज संघामध्ये सलामीवीर म्हणून इशान किशनला संधी देण्यात आली. यादरम्यान इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने इशानने २१० धावा केल्या. इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरं केलं. विशेष म्हणजे हे दोघेही टी-२० क्रिकेटप्रमाणे वेगाने खेळत होते. म्हणूनच इशानने सर्वात वेगवान द्वीशतक साजरं करण्याचा विक्रम आपल्या नावे केला तर विराटनेही त्यानंतर ८३ चेंडूंमध्येच शतकं साजरं केलं.

Virat Kohli Fined 50 percent Match Fees For Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: विराट कोहलीला आऊट झाल्यावर पंचांशी वाद घालणं पडलं महागात, ठोठावला मोठा दंड
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

सामन्यातील ३५ व्या षटकामधील शेवटच्या चेंडूवर इशानने लेग साइडला चेंडू प्लेट करत एक धाव घेत आपलं द्विशतक साजरं केलं. २०० वी धाव काढतानाच हेल्मेट काढून हातात घेत हात लांबवून इशानने आनंद साजरा केला. ही धाव पूर्ण झाल्यानंतर स्टाइकर्स एण्डला पळालेला विराट पुन्हा इशानकडे आला. मात्र इशानच्या जवळ आल्यानंतर त्याने एका हातात बॅट आणि दुसरा हात उंचावून भांगडा करत इशानला मिठी मारली. विराट यावेळी अगदी मनमोकळेपणे हसत होता. विराटची ही भावमुद्रा अनेकांना फारच आवडली असून आता हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

नक्की पाहा >> Video: याला म्हणतात किंग कोहलीचा राजेशाही थाट! खणखणीत Six ने साजरं केलं ७२ वं शतकं; हा शॉट गोलंदाजही पाहतच राहिला

तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

१)

२)

३)

४)

इशान २१० धावांवर बाद झाल्यानंतर विराटने पुढील काही षटकं फलंदाजी केली. विराटही ९१ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी करुन तंबूत परतला. भारताने बांगलादेश समोर ४१० धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.