IND vs ENG 2nd Test Day 4 Live Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२७ धावा करत डाव घोषित केला आहे. यासह भारताला ६०७ धावांची भक्कम आघाडी मिळाली. इंग्लंड संघाने चौथ्या दिवशीच ३ मोठ्या विकेट गमावल्या आहेत. यासह संघाने ३ विकेट्स गमावत ७२ धावा केल्या आहेत. भारताकडे अजूनही ५३६ धावांची आघाडी आहे आणि विजयासाठी ७ विकेट्सची गरज आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने १ तर आकाशदीपने २ विकेट्स घेतले आहेत.

जो रूट क्लीन बोल्ड

आकाशदीपने जो रूटला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवली आहे. इंग्लंडचा सर्वात मोठा अनुभवी खेळाडू असलेल्या रूटची विकेट मिळवणं आकाशदीपसाठी मोठी गोष्ट असणार आहे. रूट १६ चेंडूत ६ धावा करत माघारी परतला.

आकाशदीपचा रॉकेट थ्रो

आकाशदीपने ५व्या षटकात बेन डकेटला क्लीन बोल्ड केलं. तिसऱ्या षटकात डकेट बाद झाल्याचं अपील केलं होतं, रिव्ह्यूही घेण्यात आला होता. पण चेंडू बॅटला लागला नसल्याने तो वाचला. पण पाचव्या षटकात मात्र तिसऱ्या चेंडूवर डकेटला बोल्ड करत चकित केलं. डकेट १५ चेंडूत चौकारांसह २५ धावा करत बाद झाला.

भारताच्या खात्यात पहिली विकेट

मोहम्मद सिराजने सामन्यातील दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला शून्यावर झेलबाद केलं. जॅक क्रॉलीला साई सुदर्शनने झेलबाद केलं. इंग्लंड २ षटकांंनंतर १ बाद १३ धावा करत खेळत आहे.

भारताने डाव घोषित केला

भारतीय संघाने इंग्लंडसमोर धावांचा डोंगर ठेवला आहे. भारताने शुबमन गिलच्या १५० धावांच्या खेळीच्या जोरावर ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला. याशिवाय भारताला पहिल्या डावातील १८० धावांची आघाडी मिळाली होती. यासह भारताकडे आता एकूण ६०७ धावांची भक्कम आघाडी आहे. तर भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. तर भारताला विजयासाठी १० विकेट्सची गरज आहे.

शुबमन गिलची विकेट

शुबमन गिल १६० धावांची शानदार खेळी करत झेलबाद झाला. गिलने दोन्ही डावांमध्ये १५० धावांची खेळी केली.

गिलची फटकेबाजी अन् टीम इंडियाची आघाडी ५०० पार

भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत आता ५०० धावांच्या आघाडीचा पल्ला गाठला आहे. ५०० धावांचा पल्ला गाठल्यानंतरही भारतीय संघाने डाव घोषित केलेला नाही. टीब्रेकनंतर गिलने ख्रिस वोक्सच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार लगावत ५०० धावांचा टप्पा गाठला.

टीब्रेकपर्यंत टीम इंडियाने काय धावा केल्या?

भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं आहे. गिलने १३० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह शतक पूर्ण केलं आहे. भारताने टीब्रेकपर्यंत ४ बाद ३०४ धावा केल्या आहेत. यासह भारताने ४८४ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

गिल-पंतचं अर्धशतक

शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या वेगाने पुढे नेली आहे. यासह भारताची धावसंख्या ४०० पार नेली आहे.

चौथ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत भारताने किती धावा केल्या?

केएल राहुलची विकेट गमावल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने वनडे स्टाईलमध्ये वादळी फटकेबाजी केली आहे. ऋषभ पंतने ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली आहे. यासह भारताने लंचब्रेकपर्यंत ३ बाद १७७ धावा केल्या आहेत. यासह भारताकडे आता ३५७ धावांची मोठी आघाडी आहे.

केएल राहुलचं अर्धशतक अन् क्लीन बोल्ड

केएल राहुलने दुसऱ्या डावात खेळताना आपलं १८वं कसोटी अर्धशतक झळकावलं आहे. राहुलने ७८ चेंडूत ९ चौकारांसह ५० धावांचा टप्पा गाठला. यासह भारताची ३०० धावांची आघाडीही पूर्ण झाली आहे. अर्धशतकानंतर पुढच्याच षटकात जोश टंगने कमालीचा चेंडू टाकत केएल राहुलला क्लीन बोल्ड केलं आहे.

भारताला दुसरा धक्का

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने दुसरी विकेट गमावली आहे. ब्रायडन कार्सने करूणला ड्राईव्ह खेळण्यासाठी एक कमालीचा चेंडू टाकला, करूण तो चेंडू खेळायला गेला, पण चेंडूने बॅटची कड घेत तो थेट विकेटकिपरच्या हातात गेला. यासह करूण नायर पुन्हा एकदा चांगल्या सुरूवातीनंतर २६ धावा करत बाद झाला.

केएल राहुल-करूण नायरची जोडी मैदानात

भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरी १ बाद ६३ धावा केल्या होत्या. यापुढे खेळत केएल राहुल आणि करूण नायर यांनी भारताला २५० धावांच्या आघाडीचा पल्ला गाठून दिला.

तिसऱ्या दिवशी काय घडलं?

हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी ३०० अधिक धावांची भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले होते. यानंतर आकाशदीपने नव्या चेंडूने हॅरी ब्रुकला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह आकाशदीपच्या ४ विकेट्स आणि मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४०७ धावांवर ऑलआऊट केलं. मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या धर्तीवर पहिला फायफर घेत बुमराहच्या अनुपस्थितीत शानदार कामगिरी केली. यासह भारताला १८० धावांची आघाडी मिळाली.

इंग्लंडला पहिला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग कऱण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.