भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवला. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला. या विजयासोबतच टीम इंडियाने एक विक्रम केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IND vs ENG: धमाकेदार विजयासोबतच विराटची धोनीच्या पराक्रमाशी बरोबरी

भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात पराभूत झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात रोहितचे दीडशतक, अश्विनचे शतक, विराट-रहाणे-पंतची झुंजार अर्धशतके आणि अश्विन-अक्षर-कुलदीपची फिरकी यांच्या बळावर भारताने दमदार पुनरागमन केले. भारताने इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. धावांच्या फरकाचा विचार करता हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी १९८६ साली लीड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडला २७९ धावांनी हरवलं होते.

Ind vs Eng Video : पंतचे सुपर-स्टंपिंग! फलंदाजाच्या पायामधून पटकन अंगावर आला चेंडू अन्…

इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखले. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळून १९५ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांवर आटोपला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 2nd test india 317 run victory over england is biggest in all times creates record see stats vjb
First published on: 16-02-2021 at 13:27 IST