Jasprit Bumrah Clean Bowled Liam Dawson Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताचे गोलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहही नेहमीप्रमाणे लयीत दिसला नाही, ज्याचा संघाला फटका बसला. बुमराहच्या चेंडूंचा वेगही फार कमी होता आणि त्याला तिसऱ्या दिवशी फक्त एकच विकेट घेता आली होती. यानंतर बुमराह कसोटीतून निवृत्ती होऊ शकतो अशी चर्चादेखील सुरू आहे. दरम्यान बुमराहने चौथ्या दिवशी कमालीच्या चेंडूवर डॉसनला क्लीन बोल्ड केलं आहे. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवशी १७३ चेंडू टाकले त्यापैकी फक्त १ चेंडू १४० किमी प्रति तास वेगाचा होता. त्याचे इतर सर्व चेंडू १३२ ते १३५ च्या वेगाने होते. यावरून बुमराहला दुखापत आहे का की तो फिट नाहीये तरीही कसोटी सामना खेळतोय अशा चर्चा रंगल्या आहेत. पण बुमराहने चौथ्या दिवशी खेळ सुरू होताच विकेट घेत या सर्व चर्चांचा जोर मात्र कमी केला आहे.

जसप्रीत बुमराहचा भेदक चेंडू

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच बुमराहने त्याच्या स्पेलमधील तिसऱ्या षटकात लियाम डॉसनला बाद केलं. लियाम डॉसन हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ६५ चेंडू खेळत चांगला डिफेंन्स करत मोठे फटकेही खेळले. पण बुमराहने मात्र त्याच्या चालाख गोलंदाजीच्या जोरावर माघारी धाडलं.

बुमराहने त्या षटकातील दुसरा चेंडू शॉर्ट बॉल टाकला आणि अतिरिक्त बाऊन्स मिळाल्यामुळे डॉसन गडबडला आणि थोडक्यात वाचला. यानंतर बुमराहने तिसरा चेंडू गुड लेंग्थवरून टाकला, ज्यावर बाऊन्स मिळाला आणि थेट जाऊन ऑफ स्टम्पच्या वरच्या टोकाला लागला आणि बेल्स विखुरल्या. बुमराहने या विकेटनंतर कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. बुमराहची पहिल्या डावातील ही फक्त दुसरी विकेट आहे. बुमराहने जेमी स्मिथला झेलबाद करवत पहिली विकेट घेतली होती. याशिवाय जसप्रीतने त्याच्या उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदा गोलंदाजीत १०० पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात खोऱ्याने धावा करत मँचेस्टरच्या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या रचली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ६६९ धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडकडे ३११ धावांची मोठी आघाडी आहे. जो रूट १५० आणि बेन स्टोक्स १४१ धावांची वादळी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली.