IND vs ENG : भारतीय संघानं यजमान ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ च्या फरकानं पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडच्या माजी खेळाडूनं भारतीय संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानं खास हिंदूतून ट्विट करत भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघाबरोबरच संपूर्ण भारतात जल्लषाचं वातावरण आहे. प्रत्येक भारतीयाला टिम इंडियाच्या या कामगिरीवर अभिमान वाटत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सेलिब्रेशनही करत आहेत. मात्र, यात इंग्लडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यानं भारतीय संघाला इशारा दिला आहे. ‘जीत का जश्न जरूर मनाएं, लेकिन हमसे सावधान रहे’ असं हिंदीतून ट्विट केविन पीटरसन यानं करत भारतीय संघाला इशारा दिला आहे.

आणखी वाचा- ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची केली ‘बोलती बंद’, म्हणाला “आयुष्यभर आठवण…”

केविन पीटरसन याने ट्विटमध्ये काय म्हटलेय..?
“भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुमच्या घरात पराभूत करावे लागेल. “सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा.”

पीटरसन यानं ट्विटच्या शेवटी हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहे. एकप्रकारे पीटरसनने हसत-हसत इंग्लंडला हरवण्याचे आव्हान दिले आहे.

चेन्नई येथे इंग्लंडविरोधात होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं मंगळवारी १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.

असा आहे भारतीय संघ –

सलामीवीर : रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल

मधल्या फळीतील फलंदाज : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि के. एल. राहुल

यष्टीरक्षक – ऋषभ पंत , वृद्धीमान साहा

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल</p>

फिरकीपटू – आर. अश्विन, कुलदीप यादव

वेगवान गोलंदाज – जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

नेट बॉलर – अंकित राजपूत, आवेश खान, संदिप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार

Standbyes:: के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीप, राहुल चहर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng kevin pietersen warns team india in hindi ahead of england test series nck
First published on: 20-01-2021 at 09:23 IST