भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरी थरारक झाला. भारताच्या ४ फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडकडून विजय हिरावून घेत सामना ड्रॉ केला. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावरील भारत-इंग्लंड कसोटी पाहण्याकरता पाकिस्तानचा चाहता पोहोचला होता. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची जर्सी घालून पोहोचलेल्या या चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मँचेस्टर कसोटी सामना पाहण्यासाठी पाकिस्तानची जर्सी घालून एक चाहता पोहोचला होता. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानची जर्सी घालून बसलेला चाहता दिसताच सिक्युरिटी गार्ड त्याच्याकडे पोहोचतात आणि जर्सी काढण्याची त्याला विनंती करतात. पण पाकिस्तानी संघाची जर्सी घालतेला चाहता मात्र त्यांचं ऐकत नाही आणि त्यांच्याशी हुज्जत घालत असतो.

व्हिडिओमध्ये, स्टेडियमचा एक कर्मचारी हिरवी पाकिस्तानी जर्सी घातलेल्या माणसाकडे येतो आणि त्याला सांगतो की त्याला सामन्यात सहभागी नसलेल्या संघाची जर्सी घालण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्याने ही जर्सी कव्हर करावी अथवा काढावी. ही घटना सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये घडली, ज्याने लगेच लोकांचे लक्ष वेधले आणि त्याने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

पाकिस्तानची जर्सी घातलेला माणूस स्वतः हा व्हिडिओ बनवतो आणि म्हणतो की त्याला जर्सी काढण्यास सांगितले जात आहे. स्टेडियममधील कर्मचाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही, पाकिस्तानी खेळाडूने त्याची जर्सी काढण्यास किंवा झाकण्यास नकार दिला. तो म्हणाला की माझ्या आजूबाजूला बसलेल्या कोणत्याही भारतीय चाहत्याला यावर कोणताही आक्षेप नाही.

या दरम्यान, पाकिस्तानचा चाहता सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून त्याची पाकिस्तानची जर्सी त्याने काढावी यासाठी लेखी अर्ज लिहून देण्यास सांगतो. सुरक्षा कर्मचाऱ्याकडे याचे उत्तर नसते आणि तो एका वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना बोलावतो. अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलिस त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या माणसाला काही मिनिटांसाठी चर्चेसाठी बाहेर घेऊन जातात, परंतु नंतर त्याला सोडण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर पोस्टच्या खाली एका चाहत्याने नियम नेमका काय आहे हे समजावून सांगितले, तुमच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बॅगांची झडती घेतली जाईल. शक्य असल्यास, स्टेडियममध्ये लवकर प्रवेश मिळवण्यासाठी बॅगा आणणे टाळा. फक्त इंग्लंड किंवा भारत क्रिकेट संघांचे झेंडे, जर्सी आणि बॅनर स्टेडियममध्ये आणण्यासाठी परवानगी आहे.