Ravichandran Ashwin equals with Muttiah Muralitharan : भारत आणि इंग्लंड संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारताने मालिका ४-१ ने खिशात घातली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने आपली १०० वी कसोटी खेळताना सर्वाधिक ९ विकेट्स घेत विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर त्याने संपूर्ण मालिकेत २६ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आणि कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात कोणालाही न जमलेला पराक्रमही केला.

मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी केली बरोबरी –

धरमशाला कसोटी हा रविचंद्रन अश्विनचा १००वा सामना होता. या सामन्यात त्याने ९ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या बरोबरच त्याने मुथय्या मुरलीधरनच्या एका विक्रमाशी बरोबरी केली. कारण मुथय्या मुरलीधरनही त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १४१ धावा देताना ९ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, रविचंद्रन अश्विनने ११८ धावा खर्च करत ९ फलंदाजांना तंबूत पाठवले.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

अश्विन कसोटीत हा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज –

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. अश्विनने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या पदार्पणातही त्याने ‘५ विकेट्स हॉल’ घेतला होता. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पदार्पणात आणि १०० व्या कसोटी सामन्यात ‘५ विकेट्स हॉल’ घेणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!

अश्विनची धरमशाला कसोटीतील कामगिरीवर प्रतिक्रिया –

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “जर मला विश्वास वाटत असेल की, मी काहीतरी प्रयत्न करू शकेन, तर मी कधीच मागे हटत नाही. चांगला प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी माझे कान आणि डोळे उघडे ठेवतो. जोपर्यंत मी प्रयत्न करत नाही तोपर्यंत मी कधीच शिकणार नाही. एकाच पद्धतीला चिकटून राहून चालणार नाही असे मी म्हणत नाही. पण कृतज्ञतापूर्वक प्रयोग आणि शिकल्याने मला मदत झाली आहे. मी खूप आनंद आहे. त्यामुळे मला आत्ता नक्की कसे वाटत आहे, हे मी सांगू शकत नाही. १००व्या कसोटीपूर्वी खूप लोकांकडून शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल सर्वांचे आभार.” त्याने मालिकेत शानदार कामगिरी करताना ५ सामन्यात एकूण २६ विकेट घेतल्या.