भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे. आज या कसोटीचा दुसरा दिवस असून भारताने इंग्लंडला ३८७ धावांवर सर्वबाद केलं आहे. कसोटी सामन्यात लंचब्रेक दिला जातो. भारताने पहिल्या सत्रात ३ विकेट्स घेतले आणि त्यानंतर लंच ब्रेक झाला. लंचब्रेकमध्ये भारतीय संघासाठी काय जेवण होतं, याचा फोटो होम ऑफ क्रिकेटवरून शेअर करण्यात आला.
कसोटी सामन्याच्या प्रत्येक ठिकाणी लंचब्रेकमध्ये संघांसाठी वेगवेगळं जेवण असत. पण लॉर्ड्सच्या ऐतिहासिक लॉर्ड्सचे मैदान प्रत्येक खेळाडूसाठी खूप खास असते. या मैदानाला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जात. जर टीम इंडियाने या मैदानावर विजय मिळवला तर ते केवळ कसोटी मालिकेतच पुढे जाणार नाही तर शुबमन गिलच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक विजय ठरेल. याशिवाय या कसोटी मालिका विजयामध्ये या सामन्यातील विजय दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.मैदानावर टीम इंडियासाठी काय जेवण होतं हे जाणून घेऊया. लॉर्डस क्रिकेट मैदानाचं होम ऑफ क्रिकेट नावाचं सोशल मीडिया अकाऊंट आहे. यावर आजच्या लंचमध्ये काय पदार्थ होते याची माहिती दिली आहे.
लॉर्ड्सने पोस्ट केलेल्या फोटोनुसार, टीम इंडियाला दुपारच्या जेवणात चिकन मीटबॉल्स, मटण करी, मासे, पनीर टिक्का, बासमती तांदूळ, फळांचे सॅलड आणि ग्रीक दही हे पदार्थ होते. लॉर्ड्समध्ये आज दुपारच्या जेवणात एकूण १३ पदार्थ होते. फक्त टीम इंडियाच नाही तर इंग्लंड संंघासाठी देखील हाच मेनू असेल.
लॉर्ड्स कसोटीच्या लंचमधील पदार्थ
बटरनट स्क्वॅश सूप विथ ब्रियोच क्राउटन्स
हॅरिसा मॅरीनेटेड चिकन मीटबॉल्स विथ स्पेगेटी, स्क्वॅश, कुरगेट, स्प्रिंग ओनियन
मिसो मॅरीनेटेड कॉड लोइन विथ फनेल, कोरगेट, डिल सॅलड, केल, मिसो, सोया आणि आल्याचं ड्रेसिंग
मटण करी
बटरनट स्क्वॅश आणि पमकिन कोरमा
मटार आणि पुदिना टॉर्टेलिनी, गाजर प्युरी आणि व्हाईट वाईन सॉस
पनीर टिक्का
कोळंबी / मेरी रोझ सॉस
बासमती तांदूळ
क्रश्ड पोटॅटो / स्प्रिंग ऑनियन, गाजर, फ्रेंच बीन्स, ब्रोकोली
फ्रूट सॅलड
ग्रीक योगर्ट/फळं
लॉर्ड्सचे मैदान प्रत्येक खेळाडूसाठी खूप खास असते. या मैदानाला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जात. जर टीम इंडियाने या मैदानावर विजय मिळवला तर ते केवळ कसोटी मालिकेतच पुढे जाणार नाही तर शुबमन गिलच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक विजय ठरेल. याशिवाय या कसोटी मालिका विजयामध्ये या सामन्यातील विजय दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.