India Vs England 5th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने बुधवारीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडने प्रवेश केला आहे. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण करत आहे. रजत पाटीदारच्या जागी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा १०० वा सामना आहे. कर्णधार रोहित म्हणाला की, संघात दोन बदल केले आहेत. पडिक्कलशिवाय जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. आकाश दीपच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. रोहितने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी सराव करताना रजतला दुखापत झाली. धरमशाला येथील हवामान पाहता, येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला होती, परंतु खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर स्टोक्सने आपला प्लॅन बदलला. त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांसह दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडला परत आणण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेटपासून दोन विकेट्स दूर असलेल्या जेम्स अँडरसनसह तो गोलंदाजीचे नेतृत्व करेल. फिरकी विभागात रांची कसोटीत आठ विकेट घेणारे ऑफ-स्पिनर शोएब बशीर आणि टॉम हार्टली जबाबदारी सांभाळतील. इंग्लंडने रॉबिन्सनच्या रूपाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे.

देवदत्त पडिक्कलचे कसोटी पदार्पण –

यापूर्वी देवदत्त पडिक्कलने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यातून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला आतापर्यंत केवळ २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, रजत पाटीदारच्या जागी देवदत्तला पदार्पणाची संधी मिळाली. धर्मशाला कसोटीपूर्वी प्रशिक्षणादरम्यान पाटीदार जखमी झाला आहे. १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या आश्विनने त्याला पदार्पणाची कॅप सोपवली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

इंग्लंड : झॅक क्रॉउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.