भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम रायपूर येथे प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या १०८ धावांवर आटोपला. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मीची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यामुळे भारतीय संघाला आता १०९ धावांचे इतके सोपे लक्ष्य मिळाले आहे.

न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. त्याचबरोबर मागल्या सामन्यातील नायक मायकेल ब्रेसवेलने ३० चेंडूत ४ चौकार लगावत २२ धावांचे योगदान दिले. तसेच मिचेल सँटनरने ३९ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार लगावले. या तिंघाव्यतिरिक्त कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ अवघ्या ३४.३ षटकांत १०८ धावांवर गारद झाला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 RCB vs LSG Match Updates in Marathi
RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय

न्यूझीलंड संघाचे ५ फलंदाज अवघ्या १५ धावांवर गारद झाले होते. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ५ खेळाडू इतक्या स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे या संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

पहिल्या ५ विकेट्स गमावताना न्यूझीलंडची वनडे सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या –

१५/५ विरुद्ध भारत, रायपूर २०२३
१८/५ विरुद्ध श्रीलंका, कोलंबो २००१
२०/५ विरुद्ध बांगलादेश, मीरपूर २०१०
२१/५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, फरीदाबाद २००३

या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ६ षटकांत १८ धावा दिल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्माकडे गेल-आफ्रिदीच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी; करावे लागेल फक्त ‘हे’ काम

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज