Rohit Sharma breaks Chris Gayle’s record by hitting 50 sixes in ODI World Cup: भारताचा कर्णधार रोहित शर्माने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात षटकारांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत त्याने एक, दोन नाही तर तीन विश्वविक्रम केले आहेत. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर गेल्या सामन्यात त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकत एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. आता रोहित शर्माने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध तीन षटकार मारून आणखी एक विश्वविक्रम केला आहे. संपूर्ण स्पर्धेप्रमाणेच त्याने संघाला चमकदार सुरुवात करून दिली आणि २९ चेंडूत ४७ धावा केल्या.

हिटमॅनचा आणखी एक विश्वविक्रम –

रोहित शर्माने याआधी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले होते. आता त्याने विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने वनडे वर्ल्ड कपमध्ये ४९ षटकार मारले होते. न्यूझीलंडविरुद्ध तीन षटकार मारून रोहितने विश्वचषकात ५० षटकार पूर्ण केले आणि हा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. तसेच सध्याच्या विश्वचषकात रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.

हेही वाचा – Rachin Ravindra: सचिन-द्रविडच्या नावावर खरच ठेवलंय का रचिन रवींद्रचं नाव? वडिल रवी कृष्णमूर्तींनी दिले स्पष्ट उत्तर

यासह रोहित शर्माने विश्वचषकातील आपल्या १००० धावाही पूर्ण केल्या. उपांत्य फेरीत भारताचे नेतृत्व करणारा तो सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी, एमएस धोनीने वयाच्या ३३ व्या वर्षी २०१५ च्या विश्वचषकात संघाला उपांत्य फेरीत नेले होते. त्यानंतर विराट कोहलीने २०१९ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी भारताचे नेतृत्व केले होते. आता रोहित शर्माने वयाच्या ३६व्या वर्षी भारतीय संघाचे उपांत्य फेरीत नेतृत्त्व केले आहे.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणार फलंदाज –

५० – रोहित शर्मा*
४९ – ख्रिस गेल
४३ – ग्लेन मॅक्सवेल<br>३७ – एबी डिव्हिलियर्स
३७ – डेव्हिड वॉर्नर</p>

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामन्याबाबत ट्विटरद्वारे धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक मारणारे षटकार फलंदाज

२७ – रोहित शर्मा (२०२३)*
२६ – ख्रिस गेल (२०१५)
२२ – इऑन मॉर्गन (२०१९)
२२ – ग्लेन मॅक्सवेल (२०२३)*
२१ – एबी डिव्हिलियर्स (२०१५)
२१ – क्विंटन डी कॉक (२०२३)*