अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला आणि मालिका १-० अशी जिंकली. चौथ्या दिवशी भारताने पहिल्या तासातच किवी संघाच्या उर्वरित पाच विकेट्स घेत मोठा विजय नोंदवला. या संपूर्ण सामन्यादरम्यान विराट खूप चांगल्या मूडमध्ये दिसला, जिथे तो कॅमेरामनसोबत मस्ती करताना दिसला, तर कधी प्रेक्षकांच्या मागणीवर तो नाचतानाही दिसला.

विराटशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट बॉलिवूड चित्रपट ‘राम लखन’मधील ‘वन टू का फोर’ गाण्यावर फिल्डिंग करतेवेळी नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मागणीनुसार विराट डान्स करत आहे. विराटने मैदानावर आपल्या डान्सद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विराट अनेकवेळा डान्स करताना दिसला आहे.

न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधारासमोर आता दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान आहे. भारत आता लवकरच दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे, जिथे संघ प्रोटीज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये हा सामना होणार आहे.

हेही वाचा – IND vs NZ : जसा गुरू तसा संघ..! टीम इंडियानं मुंबई कसोटीसोबत मनंही जिंकली; वाचा नक्की काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उभय संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी २०२२ जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल आणि तिसरी आणि शेवटची कसोटी ११ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवली जाईल.