Weather for India Pakistan Asia Cup Final: आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ आशिया चषकात तिसऱ्यांदा एकमेकांविरूद्ध खेळताना दिसणार आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. त्यामुळे आता या अंतिम सामन्यात टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक नोंदवणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अंतिम सामन्यासाठीचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज कसा असणार जाणून घेऊया.
भारतीय संघाने २०२५ च्या आशिया चषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेले नाही, त्यामुळे संघ उत्तम फॉर्मात आहे. अभिषेक शर्मा फलंदाजीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने सुपर फोरमधील तिन्ही सामन्यांमध्ये वादळी फटकेबाजी करत सलग तीन अर्धशतकं झळकावली, तर इतर फलंदाज संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानची फलंदाजी सर्व सामन्यांमध्ये फेल ठरली. पण संघाच्या गोलंदाजी विभागाने चांगली कामगिरी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील टी-२० सामन्यांतील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तानने आतापर्यंत १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी ११ सामने भारताने जिंकले आहेत, तर तीन सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता, परंतु तो सामना भारताने बॉल-आउटद्वारे जिंकला.
पिच रिपोर्ट IND vs PAK, Asia Cup Final, Pitch Report
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे अबू धाबीच्या खेळपट्टीपेक्षा स्लो राहिली आहे. पण, शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात फलंदाजीसाठी ही चांगली खेळपट्टी ठरली. सुपर फोरमधील या अखेरच्या सामन्यात एकूण ४०० अधिक धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यासाठीही अशीच खेळपट्टी असण्याची अपेक्षा आहे, जी गोलंदाजांनाही काही प्रमाणात मदत करेल आणि धावांचा पाऊस पाडेल. दोन्ही संघांकडे मजबूत गोलंदाजी युनिट आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजीने सामना फिरवू शकतात.
IND vs PAK Asia Cup Final Weather Forevast: अंतिम सामन्यादरम्यान कसं असणार हवामान?
दुबईमध्ये दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने दिवसाचे तापमान खूपच उष्ण आहे. रविवारसुद्धा असंच वातावरण असण्याची अपेक्षा आहे. अंदाजानुसार, रविवारी तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर संध्याकाळी ३१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत दवाचा फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही