scorecardresearch

Premium

IND vs SA 1st T20: टीम इंडियासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग-११

IND vs SA 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघाची कशी असेल प्लेईंग-११, जाणून घ्या.

IND vs SA: First T20 between India and South Africa today know the possible playing 11 of both the teams
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ वेळा सामना झाला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs South Africa 1st T20: रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. आता युवा संघ सलग दुसरी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज उतरणार आहे. दुखापतग्रस्त कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल सुरू होईपर्यंत बाहेर आहे आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्रांती घेतली आहे. याशिवाय, जूनमध्ये होणा-या टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या टी-२० भवितव्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत संघाच्या यश किंवा अपयशाबाबत कोणीही फारसे काही सांगू शकणार नाही.

टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या मुख्य संघाबाबतची परिस्थिती आयपीएलच्या महिनाभरानंतरच स्पष्ट होईल कारण, त्यावेळी खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस हा निवडीचा निकष असेल. जानेवारीच्या मध्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका मालिका ही भारताची शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका असेल.

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
South Africa lost to New Zealand in Test cricket match sport news
न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी द्रविडने सांगितला टीम इंडियाचा गेम प्लॅन; “आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर…”

तिन्ही संघात श्रेयस, मुकेश, इशान यांचा समावेश आहे

भारताने टी-२० मालिकेसाठी १७ खेळाडू घेतले आहेत आणि त्यापैकी फक्त तीन, श्रेयस अय्यर, मुकेश कुमार आणि इशान किशन हे ५० षटकांच्या फॉरमॅटचा भाग आहेत. पण संघाला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल ज्यात सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला गेल्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या बचावात्मक प्रवृत्ती बदलाव्या लागतील.

ऋतुराजकडे दुर्लक्ष करता येणार नाही

यशस्वी जैस्वाल आक्रमक फलंदाजी करू शकतो हे त्याने आधीच दाखवून दिली आहे. शुबमन गिल आता सर्व फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून पहिली पसंती बनला आहे दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडलाही दुर्लक्ष करता येणार  कठीण जाईल. अडचण अशी आहे की जैस्वाल, गिल आणि गायकवाड या त्रिकुटाने फलंदाजी केली तर चौथ्या क्रमांकानंतर इशान किशन हा फारसा चांगला पर्याय नाही. चौथ्या क्रमांकावर भारताचा नंबर वन टी-२० फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार आहे, त्यामुळे सलामीवीर म्हणून कोणाची निवड होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: IND vs PAK: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुन्हा एकदा भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या केव्हा, कुठे,कसा पाहाल सामना?

इशानला जितेश आव्हान देईल?

इशान किशनसमोर यष्टीरक्षक पदासाठी जितेश शर्माचे कडवे आव्हान असेल कारण, तो सहाव्या क्रमांकावर ‘फिनिशर’ म्हणून चांगली कामगिरी करत आहे. पाचव्या स्थानावर श्रेयस अय्यरला मार्को जेनसेन, गेराल्ड कोएत्झी आणि अँडिले फेलुक्वायो यांच्या शॉर्ट-पिच चेंडूंच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. इशानचा समावेश झाल्यास जितेशला संधी मिळणार नाही कारण, दोघेही यष्टिरक्षक फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाईल. ऋतुराज, जैस्वाल, रिंकू आणि जितेश यांसारख्या खेळाडूंसाठी किंग्समीडमधील अतिरिक्त बाऊन्स वेगळ्या प्रकारचे आव्हान असेल.

क्लासेन, मिलर, मार्कराम गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात

दक्षिण आफ्रिकेचा मुख्य वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर ऑनरिक नॉर्खिया आणि लुंगी एनगिडी दुखापतग्रस्त आहेत, परंतु आफ्रिकन संघ स्वतःच्याच मैदानावर खूप मजबूत असेल. ऑस्ट्रेलियाने बहुतांश सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजीला आव्हान दिले, पण दक्षिण आफ्रिकेत शॉट पीचचे महत्त्व वेगळे असते.

जरी क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या संघात नसला तरी हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, कर्णधार एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स आणि मॅथ्यू ब्रित्झके हे भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात. या मालिकेत रवींद्र जडेजा उपकर्णधार असून त्याच्याकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी अपेक्षित आहे. दुसरा फिरकीपटू नक्कीच ‘गुगली’ स्पेशालिस्ट रवी बिश्नोई असेल जो आता जगातील नंबर वन टी-२० फिरकीपटू आहे. दीपक चाहर, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे तीन वेगवान गोलंदाजी पर्याय असतील अशी अपेक्षा आहे.

दोन्ही संघांपैकी ११ खेळण्याची शक्यता आहे

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रिट्झके, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, आंद्रे बर्जर, तबरेझ शम्सी.

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa 1st t20 team indias probable playing 11 what will be the combination avw

First published on: 10-12-2023 at 11:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×