विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे. मात्र त्याचबरोबर जगातील आघाडीच्या फलंदाजांमध्ये समावेश असणाऱ्या विराट कोहलीही या सामन्यामध्ये वाँडर्सच्या मैदानावर एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी आहे तर विराटचा विक्रमही अवघ्या सात धावांवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोहान्सबर्गमधील वाँडर्सच्या मैदानावर कोहलीकडून नव्या वर्षांत नेतृत्व आणि फलंदाजीत अधिक चमक दाखवण्याची अपेक्षा आहे. वाँडर्स येथील कसोटी भारताने जिंकली, तर सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी येईल. त्याशिवाय वाँडर्सवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरण्यासाठी कोहलीला अवघ्या सात धावांची आवश्यकता आहे. २०१८ मध्ये वाँडर्सवरच भारताने वेगवान माऱ्याच्या बळावर आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकून सर्वोत्तम संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test virat kohli can break rahul dravid record scsg
First published on: 03-01-2022 at 10:36 IST