केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसअखेरीस डीन एल्गरला जसप्रीत बुमराहने बाद केल्याने भारताला दुसरे यश मिळाले आहे. पण शेवटच्या सत्रात दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला आणि त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गरला नाबाद घोषित करण्यात आल्यावरुन वादही चव्हाट्यावर आला. आले. एल्गरला रविचंदनन अश्विनने एलबीडब्ल्यू आऊट केले, पण एल्गरने डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) घेतला आणि चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले. हे पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले, कारण चेंडू खूपच खाली होता आणि चेंडू यष्टींवरून गेला असे प्रक्षेपण दाखवत होते. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली, गोलंदाज आर अश्विन आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २१व्या षटकातील चौथा चेंडू अश्विनने टाकला, एल्गर त्या चेंडूचा बचाव करू शकला नाही आणि चेंडू पायावर गेला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी बाद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अंपायरने एल्गरला बाद घोषित केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एल्गरने सहकारी फलंदाज पीटरसनशी बोलून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. एल्गरने डीआरएस रिव्ह्यू घेतल्यानंतर, बॉल ट्रॅकिंग टीव्ही रिप्लेमध्ये दिसले आणि असे दिसून आले की चेंडू खेळपट्टीच्या रेषेवर आला पण खेळपट्टीला आदळल्यानंतर तो स्टंपमधून बाहेर पडताना दिसत होता. हे पाहून भारतीय संघातील खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला.

त्याचवेळी, बॉल ट्रॅकिंगवर चेंडू स्टंपवरून जात असल्याचे पाहून तिसऱ्या पंचाने एल्गरला नाबाद घोषित केले. तिथेच पडद्यावर चेंडू स्टंपच्या वर जाताना पाहून मैदानावरील पंचही हैराण झाले. इतकंच नाही तर मैदानावरील पंच मारायस इरास्मस ‘हे अशक्य आहे’ असं म्हणत असताना स्टंप माइकमध्ये त्यांचा आवाज कैद झाला.

पण तिसऱ्या पंचाने एल्गरला नॉट आऊट देण्यास सांगितले, त्यामुळे मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. या निर्णयामुळे भारतीय संघाचे खेळाडू खूप दुखावले गेले, अगदी अश्विनने आपला राग व्यक्त केला. दुसरीकडे, कर्णधार कोहलीही या निर्णयावर गप्प बसला नाही आणि स्टंप माईकवर गेला आणि ब्रॉडकास्टरलाच लक्ष्य करताना दिसला.

या घटनेनंतर अश्विन स्टंपमाईकजवळ गेला आणि आपला राग व्यक्त केला. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला दुसरा मार्ग शोधायला हवा होता, असे अश्विनने म्हटले. अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि सोशल मीडियावर चाहते अश्विनला पूर्ण पाठिंबा देत आहेत. यावेळी विराटनेही “फक्त विरोधी नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा. सर्वांच्या चुका पकडण्याचा प्रयत्न करा”, असे म्हटले. राहुचेही बोलणे स्टम्प माइकमधून ऐकू आले. ”संपूर्ण देश अकरा खेळाडूंविरुद्ध खेळत आहे”, असे राहुलने म्हटले.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय खेळाडू निराश आणि दबावाखाली आहेत आणि त्यामुळेच त्यांनी डीआरएसचा मुद्दा उचलून धरला. सामना सध्या एका मनोरंजक टप्प्यावर आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ असा सामना जिंकला असून केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १०१/२ आहे आणि संघाला विजयासाठी १११ धावा करायच्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa indian players comment on broadcasters regarding drs r ashwin stump mic voice recorded abn
First published on: 14-01-2022 at 09:42 IST