Sai Sudharsan’s half century in debut ODI: गेल्या महिन्यात, जेव्हा निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती, तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की तामिळनाडूच्या२२ वर्षीय साई सुदर्शनची वन डे संघात निवड होईल. सुदर्शनचा समावेश हा एक आश्चर्यकारक निर्णय होता आणि तिन्ही संघांमध्ये तो एकमेव नवीन चेहरा होता, कारण बाकीच्या खेळाडूंनी कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. रजत पाटीदार पदार्पण करू शकला नाही, पण याआधीही त्याची वन डे संघात निवड झाली आहे.

सुदर्शनची देशांतर्गत क्रिकेटमधील भक्कम फलंदाजी लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. या फलंदाजाने आपल्या बुद्धीने सर्वांना प्रभावित केले आहे. वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी अनेक वेळा परिपक्वता दाखवली आहे. सुदर्शनने आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले आणि पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ५५ धावा करत टीम इंडियाला विजयाकडे नेले. भक्कम बचावाबरोबरच त्याने आक्रमकताही दाखवली. सुदर्शनने नऊ चौकार मारले.

Shahrukh khan statement after match
IPL 2024 : ‘सामन्याआधी मला कळलं मी ४ नंबरवर फलंदाजीला उतरणार, पण…’, पहिल्या अर्धशतकानंतर शाहरूख खान काय म्हणाला?
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

साई सुदर्शनची उत्तम कामगिरी

शुबमन गिलचा वन डे संघात समावेश नव्हता. अशा स्थितीत साई सुदर्शन किंवा रजत पाटीदार एकदिवसीय सामन्यात ऋतुराज गायकवाडबरोबर सलामीला फलंदाजी करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. रजतला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आले. त्याचवेळी प्लेइंग-११मध्ये स्थान मिळवण्यात सुदर्शनला यश आले. सुदर्शनला इतक्या सहज संधी मिळाली नाही. त्यांच्या दीर्घ कालावधीतील मेहनत आणि समर्पणाचे हे फळ आहे. वयाच्या २२व्या वर्षी या खेळाडूने आपले तंत्र आणि स्वभाव सिद्ध केला आहे. आयपीएल असो वा तामिळनाडू प्रीमियर लीग किंवा देशांतर्गत स्पर्धा, सुदर्शनने प्रत्येक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

भारतीय संघाने रविवारी जोहान्सबर्ग येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (१०-०-३७-५) पहिल्या एकदिवसीय सामन्यात सामनावीर ठरला. आवेश खानने घेतलेल्या चार विकेट्सशिवाय, श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावले, परंतु पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या २२ वर्षीय साई सुदर्शने सर्वांचेच मन जिंकले. डावाच्या सुरुवातीला या डावखुऱ्या फलंदाजाने उसळत्या चेंडूंविरुद्ध अतिशय चांगले बचावात्मक तंत्र दाखवले, पण नंतर त्याने काही उत्कृष्ट फटकेही मारले. ४३ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५५ धावा करून या स्टार फलंदाजाने आपले भविष्य उज्ज्वल असल्याचे दाखवून दिले.

साई सुदर्शनने सर्वाना प्रभावित करणारी अर्धशतकी खेळी खेळली. यासह या डावखुऱ्या फलंदाजाने अशी कामगिरी केली, जी त्याच्या आधी टीम इंडियासाठी फक्त चार सलामीवीर फलंदाजी करू शकले. होय, साई सुदर्शन आपल्या कारकिर्दीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा चौथा भारतीय सलामीवीर ठरला. सुदर्शनपूर्वी रॉबिन उथप्पाने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ८६ धावा केल्या होत्या, के.एल. राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या, विदर्भाकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या फैज फजलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ५५ धावा केल्या होत्या आणि आता साई सुदर्शनने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ५५ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५५ धावांची नाबाद खेळी खेळली.

सुदर्शनच्या कुटुंबाची आहे क्रीडा पार्श्वभूमी

साई सुदर्शनच्या कुटुंबाला खेळाची खूप आवड आहे. त्यांचे वडील भारद्वाज हे अ‍ॅथलीट होते. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तर त्याची आई उषा भारद्वाज तामिळनाडूकडून व्हॉलीबॉल खेळली आहे. सुदर्शन लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जात होता. त्याने २०१९-२० मध्ये १० वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत-अ संघात यशस्वी जैस्वालबरोबर सलामीला फलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा, लखनऊ सुपर जायंट्सचा रवी बिश्नोई आणि भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार प्रियम गर्ग हे त्या स्पर्धेचा भाग आहेत. एकदिवसीय पदार्पणात ५०+ धावा करणारा साई सुदर्शन हा १७वा भारतीय आहे.

हेही वाचा: IPL 2024: रोहित शर्माला कॅप्टन्सीवरुन हटवल्याचे पडसाद अजूनही सोशल मीडियावर सुरूच, ट्विटर #RIPMumbaiIndians होतोय ट्रेंड

एकदिवसीय पदार्पणात भारतीय सलामीवीर म्हणून अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंची नावे

८६ – रॉबिन उथप्पा वि. इंग्लंड, २००६

१००* – के.एल. राहुल वि. झिंबाब्वे, २०१६

५५* – फैज फजल वि. झिंबाब्वे, २०१६

५५* – साई सुदर्शन वि. एसए, २०२३*ही करतो