२०२० वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध इंदूरच्या मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोण काढतं यासाठी रोहित आणि विराटमध्ये शर्यत लागली होती. मात्र २०१९ वर्षातला अखेरचा टी-२० सामना खेळल्यानंतर दोघांमधली ही शर्यत बरोबरीत सुटली होती. दोन्ही फलंदाज २०१९ वर्षाच्या अखेरीस २६३३ धावांनिशी संयुक्तपणे अव्वल स्थानी होते.

मात्र रोहित शर्माने लंकेविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती घेतली असल्यामुळे विराटकडे रोहितला मागे टाकण्याची चांगली संधी होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या टी-२० सामन्यात लंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शिखर-लोकेश राहुल जोडी माघारी परतल्यानंतर विराटने एक धाव काढत रोहितला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 2nd t20i virat kohli becomes leading run scorer in t20i cricket gets pass rohit sharma psd
First published on: 07-01-2020 at 21:58 IST