२०२० वर्षात भारतीय संघ आपला पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. रविवारी आसामच्या गुवाहटीत हा सामना खेळला जाईल. मात्र पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाच्या समस्येत वाढ झाली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली क्षेत्ररक्षणाचा सराव करत असताना त्याच्या बोटाला दुखापत झाली. हा प्रकार घडताच संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, विराटच्या दुखापतीवर औषधोपचार केले. यानंतर विराटने आपला सराव सुरु ठेवला, मात्र त्याची दुखापत नेमकी किती गंभीर आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. त्यामुळे पहिल्या सामन्यात विराट खेळतो की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन