IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटीत शतकी खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५वा खेळाडू ठरला. या आधी रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ ला पदापर्पणात शतक झळकावले होते. त्याने १७७ धावा केल्या होत्या. योगायोग म्हणजे रोहीतनेही हा पराक्रम विंडीजविरुद्ध केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताकडून १५ डिसेंबर १९३३ साली लाला अमरनाथ यांनी पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. त्यांनी त्या सामन्यात ११८ धावा केल्या होत्या. त्यानंतर १९५२ साली दीपक शोधन यांनी पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ११० धावा केल्या होत्या. १९५५ साली न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत कृपाल सिंग यांनी नाबाद शतक झळकावले होते. त्यानंतर अब्बास अली बेग (११२) यांनी १९५९ साली, हनुमंत सिंग (१०५) यांनी १९६४ साली, गुंडप्पा विश्वनाथ (१३७) यांनी १९६९ साली, सुरिंदर अमरनाथ (१२४) यांनी १९७६ साली, मोहम्मद अझरुद्दीन (११०) याने १९८४ साली, प्रवीण आमरे (१०३) याने ११९२ साली तर सौरव गांगुली (१३१) याने १९९६ साली पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले.

२१ शतकातही ही परंपरा सुरु ठेवत वीरेंद्र सेहवागने आफ्रिकेविरुद्ध २००१ साली पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १०५ धावांची खेळी केली होती. नंतर सुरेश रैनाने २०१० साली आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध १२० धावा केल्या होत्या. तर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली शतक झळकावले होते. तर रोहितने २०१३ साली पदार्पणात शतक झळकावले होते. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनंतर पृथ्वी शॉने आज हा पराक्रम केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi prithvi shaw becomes 15th indian to score test debut century
First published on: 04-10-2018 at 12:49 IST