विराट-अनुष्काने घेतली सात वर्षाच्या मुलाची स्वाक्षरी, पहा Video

विराट आणि अनुष्का सध्या विंडिजमध्ये आहेत..

विराट कोहलीच्या भारतीय संघाने टी २० आणि एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही वेस्ट इंडिज संघावर निर्विवाद वर्चस्व मिळवले. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिका २-० अशी जिंकली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

भारताच्या या विजयासोबतच विराट कोहलीने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरण्याचा मान मिळवला. त्यामुळे संपूर्ण देश सध्या विराट कोहलीचा ‘फॅन’ झाला आहे. पण नुकतंच कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एका सात वर्षाच्या मुलाची स्वाक्षरी घेतल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. संपूर्ण देश विराटची एक स्वाक्षरी मिळवण्याचा प्रयत्न करत असताना या दोघांनी मात्र त्या चिमुरड्याची स्वाक्षरी का घेताना दिसत आहेत. असा प्रकार का घडला असेल? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. पण त्या व्हिडीओच्या कॅप्शनने याचे उत्तर दिले आहे.

अमित लखानी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांचा भाचा आणि विराट-अनुष्का हे तिघेही एकत्र आहेत. त्यांचा सात वर्षांचा भाचा सध्या जमैकामध्ये आहे. तिथे असताना तो विराटला भेटला आणि त्याने “माझी स्वाक्षरी तुम्हाला हवी आहे का?”, असं विराट-अनुष्काला विचारलं. त्यावर विराटनेही त्याची स्वाक्षरी घेत त्या चिमुरड्याला खुश केले.

दरम्यान, विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला असला, तरी ICC च्या कसोटी क्रमवारीत मात्र तो दुसऱ्या स्थानी सरकला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs wi video virat kohli anushka sharma 7 year old boy autograph jamaica vjb