भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी करत पुन्हा एकदा आपला फॉर्म सिद्ध करुन दाखवला. विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेताना १२५ चेंडूत १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या कामगिरीसह विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय फलंदाज –

१) सचिन तेंडूलकर – १८ हजार ४२६

२) विराट कोहली * – ११ हजार ४०६

३) सौरव गांगुली – ११ हजार २२१

४) राहुल द्रविड – १० हजार ७६८

५) महेंद्रसिंह धोनी * – १० हजार ५९९

एका प्रतिस्पर्धी संघाविरोधात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या विक्रमामध्ये विराटने जवळपास सचिनला बरोबरीत गाठलं आहे.

याचसोबत एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वात जलद २ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराटने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला मागे टाकलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने सर्वात प्रथम रोहित शर्मासोबत ७४ धावांची अर्धशतकी आणि श्रेयस अय्यरसोबत १२५ धावांची शतकी भागीदारी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने सामन्यात आश्वासक धावसंख्या गाठली.