India vs West Indies: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने तयारी सुरू केली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने शुक्रवारी तयारी शिबिरासाठी १८ खेळाडूंची निवड केली आणि त्यांना सराव करण्याचा सल्ला दिला. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्रेग ब्रॅथवेट विंडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. तयारी शिबिरासाठी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. अँटिग्वा येथील सीसीजी येथे शुक्रवारपासून शिबिर सुरू होणार असून संघ तयारीला सुरुवात करेल. मात्र, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. संघाची घोषणा झाल्यानंतर विंडीजचा संघ ९ जुलै रोजी डॉमिनिकाला जाणार आहे. त्याच वेळी, १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळली जाणार आहे.

भारताविरुद्धची दुसरी कसोटी २० जुलैपासून त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवली जाईल. कसोटीनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. २७ जुलैपासून एकदिवसीय मालिकेला आणि ३ ऑगस्टपासून टी२० ला सुरुवात होणार आहे. ट्वीटरवर याची घोषणा करताना, क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) म्हणाले, “क्रिकेट वेस्ट इंडीजच्या निवड समितीने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, जो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी प्रशिक्षण शिबिरात भाग घेईल.”

MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Harbhajan Singh wants to see Virat Kohli as RCB captain in the next season of IPL
IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला
Ramandeep Singh Violation of IPL Code of Conduct,
KKR vs MI : कोलकाताच्या स्टार खेळाडूवर BCCIची मोठी कारवाई, मॅच फीच्या तब्बल ‘इतका’ टक्के ठोठावला दंड
Richard Gleeson debuts in IPL
Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
Good news for LSG team Mayank Yadav available for match against Mumbai
Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

हेही वाचा: Raunak Sadhwani: क्रिकेटचा त्याग करून १३ वर्षीय रौनक साधवानी कसा बनला चेस ग्रँडमास्टर? जाणून घ्या

वेस्ट इंडिजचा संघ सध्या आयसीसी विश्वचषक पात्रता फेरीत खेळत आहे. त्यामुळे शिबिरासाठी संघात काही वरिष्ठ खेळाडूंची निवड झालेली नाही. या खेळाडूंमध्ये जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ आणि काइल मेयर्स यांच्या नावांचा समावेश आहे. त्याच वेळी, क्वाम हॉज, अ‍ॅलिक अथानाझ आणि जैर मॅकअलिस्टर हे विंडीज कॅम्पमधील नवीन चेहरे आहेत. वर्ल्डकप क्वालिफायर खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ ९ जुलैपर्यंत झिम्बाब्वेमध्ये असेल.

माध्यमातील माहितीनुसार के.एल. राहुल सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही आठवड्यांत फलंदाजीचा सराव सुरू करण्यास सज्ज आहे. त्यांची वेस्ट इंडीज दौऱ्यावर कुठल्याही क्रिकेटच्या मालिकेत निवड करण्यात आलेली नाही. राहुल आणि बुमराह सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतून पुनरागमन करू शकतात. मात्र, याबाबत एन.सी.ए. ने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: Ajit Agarkar: BCCI लवकरच निवड समिती अध्यक्षांचा वाढवणार पगार! माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरने भरला आज फॉर्म

प्रशिक्षण शिबिरासाठी संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), अ‍ॅलिक अथानाझ, जर्मेन ब्लॅकवुड, एनक्रुमाह बोनर, तागेनरीन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, क्वाम हॉज, अकीम जॉर्डन, जैर मॅक अ‍ॅलिस्टर, किर्क मॅकेन्झी, मार्की मिनसन, मार्की आणि मार्क्सी फिलीप, रॅमन रेफर, केमार रोच, जेडेन सील्स, जोमेल वॅरिकन.