IND W vs NZ W Team India Run Out Controversy: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि न्यूझीलंड सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि टीम इंडियाला याचा मोठा फटका बसला. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने होते. दुबईत सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी केली. तर फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंड १६१ धावांचे मोठे लक्ष्य भारताला दिले आहे. पण या सामन्यातील १४व्या षटकात मोठा गोंधळ झाला, यामुळे सामना काही वेळ थांबला होता.
विश्वचषकासारख्या स्पर्धेत याआधी क्वचितच असा गोंधळ पाहायला मिळाला असेल. भारताच्या गोलंदाजीदरम्यान मोठा वाद झाला. अंपायरच्या चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून एक विकेट निसटली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर बराच वेळ वाद घालत राहिली. तर संघाचे प्रशिक्षक अमोल मुजूमदारही पंचांशी वाद घालताना दिसले.
IND W vs NZ W: रन आऊट असतानाही गमवावी लागली विकेट
हेही वाचा – IND W vs NZ W Live Score: स्मृतीनंतर भारतीय संघाला मोठी धक्का, कर्णधार हरमनप्रीत कौरही बाद
न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत होता. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा १४व्या षटकात गोलंदाजी करत होती. न्यूझीलंडची फलंदाज एमिली केरने तिच्या षटकातील शेवटचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला आणि झटपट एक धाव पूर्ण केली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर तिथे क्षेत्ररक्षण करत होती पण तिने लगेच चेंडू टाकला नाही. कारण तो षटकाचा अखेरचा चेंडू होता. हे पाहून न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन दुसऱ्या धावेसाठी गेली. पण हरमनप्रीतने थेट विकेटकीपरकडे चेंडू टाकला, ज्याने अमेली धावबाद झाली.
न्यूझीलंडची फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत असताना चौथ्या पंचाने तिला सीमारेषेजवळ थांबवले आणि परत जाण्यास सांगितले. हे पाहून भारतीय खेळाडूंना धक्का बसला आणि त्यांनी पंचांना विचारणा केली. खरंतर झालं हे की जेव्हा दोन्ही खेळाडूंनी एक धाव घेतली तेव्हा अंपायरने तिची कॅप गोलंदाज दीप्ती शर्माला परत केली आणि षटक संपल्याची घोषणा केली. या आधारावर पंचांनी ‘डेड बॉल’ घोषित करून रनआऊट नाकारले.
हेही वाचा – Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पंचांशी बोलायला सुरूवात केली. भारतीय खेळाडूंनी पंचांनाही घेरले. त्याचवेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार हे देखील ड्रेसिंग रुममधून खाली उतरले आणि सीमारेषेजवळ आले आणि चौथ्या पंचांना असे कसे होऊ शकते असा प्रश्न करताना दिसले. फलंदाज धावा घेत असतील तर षटक घोषित कसे होईल? त्यांनी चौथ्या पंचांशी बराच वेळ वाद घातला, मैदानावरील पंचांच्या प्रतिसादावर असमाधानी असताना हरमनप्रीत आणि उपकर्णधारही सीमारेषेजवळ गेले आणि चौथ्या पंचांना प्रश्न विचारू लागले.
हेही वाचा – ‘…म्हणून धोनीपेक्षा रोहितची नेतृत्त्व शैली आवडते’, हरभजन सिंगने सांगितले कारण
MCC Law – 20.1.2 The ball shall be considered to be dead when it is clear to the bowler’s end umpire that the fielding side and both batters at the wicket have ceased to regard it as in play.
Both the batters were still running for a second. pic.twitter.com/4XM2c8HKBdThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ygritte? (@Choolo56) October 4, 2024
रिप्ले पाहिल्यावर हे स्पष्ट दिसत होते की पंचांनी षटक संपल्याचे घोषित केले आणि त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावले तेव्हा त्यांना रोखले नाही. अशा स्थितीत टीम इंडियाने त्यांच्या मेहनतीनंतर हिसकावून घेतलेली विकेट कोणालाच आवडली नाही. मात्र, न्यूझीलंडलाही दुसरी धाव मिळाली नाही आणि केवळ पहिली धाव मोजली गेली.