पीटीआय, चेस्टर-ली-स्ट्रीट : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांतील निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. सेरा ग्लेनचा (२३ धावांत ४ बळी) प्रभावी मारा आणि नंतर सोफी डंकलीने (४४ चेंडूंत नाबाद ६१ धावा) केलेल्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने नऊ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात विजयासाठी १३३ धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने दमदार सुरुवात केली. सलामीवीर डंकली आणि डॅनी वॅट (१६ चेंडूंत २४ धावा) यांनी पहिल्या गडय़ासाठी ६० धावांची भागीदारी रचली. स्नेह राणाने वॅटला माघारी पाठवल्यानंतर डंकलीने अ‍ॅलिस कॅपसेच्या (२० चेंडूंत नाबाद ३२ धावा) साथीने १३व्या षटकातच इंग्लंडला विजय मिळवून दिला. डंकलीने नाबाद ६१ धावांच्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार मारला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

त्यापूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १३२ अशी धावसंख्या केली. स्मृती मानधना (२३) आणि शफाली वर्मा (१४) यांनी ३० धावांची सलामी दिली. मानधना बाद झाल्यानंतर शफाली, डी. हेमलता (१०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२०) यांना ग्लेनने माघारी धाडत भारताची ५ बाद ८८ अशी स्थिती केली. अष्टपैलू दीप्ती शर्माने (२४ चेंडूंत नाबाद २९ धावा) काही चांगले फटके मारले. मात्र, दुसऱ्या बाजूने तिला इतरांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला जेमतेम १३० धावांचाच टप्पा ओलांडता आला.

परिस्थिती अनुकूल नसतानाही खेळण्यास भाग पाडले -हरमनप्रीत

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मैदानाची स्थिती अनुकूल नसतानाही खेळण्यास भाग पाडण्यात आले, असे सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली. पावसामुळे या सामन्याला उशिरा सुरुवात झाली. ‘‘आम्हाला धावफलकावर अपेक्षित धावा नोंदवता आल्या नाहीत. परिस्थिती खेळण्यासाठी १०० टक्के अनुकूल नसतानाही आम्हाला सामना खेळण्यास भाग पाडले,’’ असे हरमनप्रीतने सांगितले. प्रतिकूल परिस्थितीमुळे खेळाडूंना दुखापतींची जोखीम होती. मात्र, त्यानंतरही सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केल्याने मी समाधानी असल्याचे हरमनप्रीतने नमूद केले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद १३२

(दीप्ती शर्मा नाबाद २९, स्मृती मानधना २३; सेरा ग्लेन ४/२३, ब्रायोनी स्मिथ १/१०) पराभूत वि. इंग्लंड :

१३ षटकांत १ बाद १३४ (सोफी डंकली नाबाद ६१, अ‍ॅलिस कॅपसे नाबाद ३२; स्नेह राणा १/३१)

  • सामनावीर : सेरा ग्लेन