विजय अमृतराज, लिएण्डर पेस व सानिया मिर्झा यांच्यासारख्या कीर्तिवान खेळाडूंमुळे भारताला टेनिसची वैभवशाली परंपरा लाभली आहे, असे अमेरिकेची माजी जगज्जेती खेळाडू व्हीनस विल्यम्स हिने सांगितले. व्हीनस भारतामध्ये चालू असलेल्या चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती म्हणाली, ‘‘भारताला अशी वैभवशाली परंपरा पुढे चालविण्याची आवश्यकता आहे. आता पुष्कळ स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळत असते. त्यांनी ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ ‘‘माझ्या यशात माझी बहीण सेरेना हिचा मोलाचा वाटा आहे. आम्ही दुहेरीत एकत्र खेळत असल्यामुळे माझ्या खेळातील चुका दुरुस्त करण्यासाठी तिच्याकडून खूप मदत होत असते. दुहेरीतील भागीदार नेहमीच एकमेकांबाबत आदर बाळगून असतात,’’ असे व्हिनसने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2014 रोजी प्रकाशित
भारताला टेनिसची वैभवशाली परंपरा -व्हीनस
विजय अमृतराज, लिएण्डर पेस व सानिया मिर्झा यांच्यासारख्या कीर्तिवान खेळाडूंमुळे भारताला टेनिसची वैभवशाली परंपरा लाभली आहे
First published on: 22-11-2014 at 05:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India have a good tradition in tennis venus williams