दिल्लीत खेळल्या जात असलेल्या इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत (India Open 2022) करोनाने शिरकाव केला आहे. भारताच्या किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (BWF) देण्यात आली आहे. भारत सध्या करोना विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. देशात दररोज सुमारे दोन लाख रुग्णांची नोंद होत आहे. त्याच वेळी, दिल्लीतही दररोज संक्रमित होणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे. इतर खेळाडूंमध्ये रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.

BWF कडून सांगण्यात आले की, मंगळवारी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बॅडमिंटनपटूंची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या अहवालात या सात खेळाडूंना संसर्ग झाल्याचे समोर आले. या बॅडमिंटन खेळाडूंसोबत दुहेरीत खेळलेल्या खेळाडूंनीही आपली नावे मागे घेतली आहेत.

Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

हेही वाचा – IPL 2022 : BCCIचा प्लॅन B तयार..! यूएई नव्हे, तर ‘या’ देशात खेळवली जाऊ शकते लीग

या खेळाडूंचे बदली खेळाडू दिले जाणार नाहीत, असे BWFकडून सांगण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंना वॉकओव्हर मिळेल. म्हणजे त्यांच्याविरुद्ध खेळणारे खेळाडू थेट पुढच्या फेरीत जातील. करोनाची वाढती प्रकरणे पाहता, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रोटोकॉल अंतर्गत इंडिया ओपन २०२२ दरम्यान आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या जात आहेत.