उर्वरित दोन सामन्यांत भारतीय संघात बदल नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करणार नसल्याचे पत्रक बीसीसीआयकडून जारी करण्यात आले आहे. भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठीचा १४ सदस्यीय भारतीय संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एखदिवसीय मालिकेसाठी सुरेश रैनाची निवड करण्यात आली होती. मात्र, रैना आजारी असल्याने त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. तो दुसऱया सामन्यात खेळू शकेल अशी आशा सर्वांना होती. पण पुढील दोन्ही सामने तो खेळू शकला नाही. अद्याप सुरेश रैना आजरपणातून बरा झालेला नसल्याने त्याला आता संपूर्ण मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय संघाने रविवारी मोहाली येथे झालेल्या सामन्यात किवींवर सात धावांनी दणदणीत विजय साजरा करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यापुढील सामना बुधवारी रांची येथे होणार असून अंतिम सामना २९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2016 रोजी प्रकाशित
सुरेश रैना संघाबाहेरच
भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-10-2016 at 19:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India retain same squad for final two odi vs new zealand suresh raina ruled out