आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताने तिसरे स्थान कायम राखले आहे, त्याचबरोबर भारताचा विराट कोहली फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर कायम आहे. भारतीय संघ १२१ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून अव्वल स्थानावर श्रीलंका आहे, तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. कोहलीने ७३१ गुणांसह सहावे स्थान कायम राखले असून या क्रमवारीत अव्वल स्थानावर इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज चौथ्या स्थानावर विराजमान आहे. गोलंदाजीमध्ये वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिन अव्वल स्थानावर आहे.