AFC U-19 Women’s Championship Qualifiers या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल युवा संघाने पाकिस्तानचा १८ -० असा धुव्वा उडवला. भारताचा हा सलामीचा सामना होता. या सामन्यात भारताकडून रेणूने सर्वाधिक ५ गोल केले आणि भारताला धुवाधार सलामी मिळवून दिली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आघाडीवर होता. दुसऱ्या मिनिटाला भारताने गोल केला. मनीषा हिने हा गोल करत भारताचे खाते उघडून दिले. त्यांनतर भारताने सपाटा लावला आणि भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाकडून इमाम फय्याज हिने गोल केला. मात्र तो स्वयंगोल असल्याने तो गोलदेखील भारताच्या खात्यात जमा झाला.