भारतीय संघ यावर्षी जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयरिश संघ चार संघांचे आयोजन करेल. भारतीय संघ जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे. पहिला सामना मालाहाइड येथे होणार आहे. आयर्लंड यंदा बांगलादेशचे यजमानपद भूषवणार नाही आणि मालिका पुढील वर्षी हलवण्यात आली आहे.

२६ जून रोजी मालाहाइड येथे भारत आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळेल. यानंतर २८ जूनला दुसरा टी-२० सामना होईल. भारताशिवाय न्यूझीलंडचा संघही तेथे खेळण्यासाठी जाणार आहे. न्यूझीलंड संघ तेथे एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत आयसीसी सुपर लीग अंतर्गत एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

गेल्या वर्षी आयर्लंडच्या दौऱ्यावर गेलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळीही काही टी-२० सामने खेळण्यासाठी तेथे जाणार आहे. क्रिकेट आयर्लंडने सांगितले, की ते दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान ब्रिस्टलमध्ये दोन टी-२० सामन्यांसाठी आफ्रिकन संघाचे यजमानपद भूषवतील.

हेही वाचा – ‘हिटमॅन’ रोहित शर्मानं घेतली नवी कार..! किंमत ऐकाल तर बसेल धक्का; पाहा PHOTO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयरिश संघ अफगाणिस्तानविरुद्ध पाच टी-२० सामने खेळणार आहे, परंतु कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. पाच टी-२० सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. यावर्षी एप्रिलमध्ये होणारा झिम्बाब्वे दौरा पुढील वर्षी ढकलण्यात आला आहे.