India Vs Aus 4th Test Score Update : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला हा चौथा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर आश्विनने भेदक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. आश्विनने आजच्या डावात ६ विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ ४८० धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन सामन्याचे हिरो ठरले. कारण ख्वाजाने १८० तर ग्रीनने ११४ धावा कुटल्या.

त्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने चांगली सुरुवात केली आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १० षटकात बिनबाद ३६ धावा केल्या असून गिल १४ तर रोहित शर्मा १७ धावांवर खेळत आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केल्याने ४ गडी गमावत २५५ धावांचा डोंगर रचला होता.

नक्की वाचा – Video : कॉमेंट्री बॉक्समध्ये सायमन डुल यांचं वादग्रस्त वक्तव्य, हसन अली यांच्या बायकोला म्हणाले, ” तिने काही लोकांचे हृदय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पाचव्या विकेटसाठी ख्वाजाने आणि कॅमेरून ग्रीनने २०८ धावांची भागिदारी केली. विशेष म्हणजे ग्रीनने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकलं. त्याने १७० चेंडूत ११४ धावा केल्या. पण अश्विनच्या फिरकी गोलंदाजीचा अचूक अंदाज न घेता आल्याने ग्रीन झेलबाद झाला. यष्टिरक्षक केएस भरतने ग्रीनचा झेल घेऊन त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कॅरीलाही आश्विनने बाद केलं. कॅरी आश्विनच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला.