दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का द्यायला सज्ज झाला आहे.
पहिल्या सामन्यात भारताला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने यजमानांवर २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे मनोबल उंचावलेला कर्णधार सरदार सिंगचा भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात आपली जादू दाखवायला तयार झाला आहे.
भारताचे प्रशिक्षक टेरी वॉल्श हे ऑस्ट्रेलियाचे असल्यामुळे त्यांना वातावरणाचा चांगला अंदाज आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा भारतीय संघाला चांगला फायदा होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाला पुन्हा धक्का देण्यासाठी भारत उत्सुक
दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का द्यायला सज्ज झाला आहे.
First published on: 08-11-2014 at 05:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs australia hockey