भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सात जानेवारी रोजी सिडनी येथे होणार आहे. या मैदानावर भारतीय संघाला आतापर्यंत फक्त एका कसोटी सामन्यात विजय मिळवता आला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून लयीत असणारा भारतीय संघ सिडनी मैदानावरील आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पाहूयात सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय खेळाडू आणि संघाचे कसे आहेत आकडे….
सिडनीमध्ये असं आहे भारतीय संघाचं प्रदर्शन –
सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १२ कसोटी सामने झाले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाच सामन्यात बाजी मारली आहे. भारतीय संघाला फक्त एका सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. सहा सामने अनिर्णीत राहिले आहे. सिडनीतील भारताची विजयाची टक्केवारी फक्त ८.३३ टक्के आहे. तर पराभवाची टक्केवारी ४१.६६ टक्के इतकी आहे. दोन्ही संघामध्ये येथे झालेली मागील दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत.
१९७८ मध्ये मिळाला होता एकमेव विजय –
सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय संघाला एकमेव विजय मिळवता आला आहे. १९७८ मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघानं एक डाव आणि दोन धावेनं विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भरातीय गोलंदाजांनी फक्त १३१ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर भारतीय संघानं ३९६ धावांचा डोंगर उभा केला होता. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही २६३ धावांवर आटोपल्यामुळे भारतीय संघानं हा सामना एक डाव आणि धोन धावेनं जिंकला होता.
सिडनीत कोणता फलंदाज चमकला?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सिडनी क्रिकेट मैदानावर पाच कसोटी सामन्यात १५७ च्या सरासरीनं ७८५ धावा चोपल्या आहेत. भारताकडून या सर्वाधिक धावा आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लक्ष्मणच्या नावावर ५४९ धावा आहेत. सिडनी क्रिकेट मैदानावर विराट कोहलीच्या नावावर २४८ धावा आहेत. मात्र तो मायदेशी परतला आहे. त्यानंतर पुजाराच्या नावावर १९३ धावा आहेत. पहिल्या दोन कसोटीत पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात पुजाराकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
कोणत्या गोलंदाजाची कमाल?
सिडनीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजमध्ये अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. कुंबळेच्या नावावर २० विकेटची नोंद आहे. त्यानंतर अश्विन आणि कुलदीप यांच्या नावावर प्रत्येकी पाच पाच विकेट आहेत.
सिडनीच्या मैदानावरील रंजक आकडेवारी –
या मैदानावर भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघानं या मैदानावर आपला डाव सात बाद ७०५ धावांवर घोषित केला होता. तर वैयक्तिक धावसंख्या मायकल क्लार्कच्या नावावर आहे. क्लाकर्कनं या मैदानावर नाबाद ३२९ धावांची खेळी केली आहे.
पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत
जाफर गुरुजींचा कानमंत्र : वॉर्नरला बाद करण्यासाठी पंतला दिला सांकेतिक सल्ला, तुम्हाला कळतोय का पाहा