JioCinemaApp :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या T20 सामन्यात भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा बदला घेणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. हा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी जिओ सिनेमावर इतका प्रतिसाद दिला की जिओ सिनेमा काही वेळासाठी क्रॅश झालं होतं. ज्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मीम्सची अक्षरशः बरसात केली.

नेमकं काय घडलं?

X या सोशल मीडिया साईटवर लोकांनी अचानक मीम्स आणि विविध प्रकारचे जोक शेअर करण्यास सुरुवात केली. हे सगळे मीम आणि जोक जिओ सिनेमासाठी होते. कारण जिओ सिनेमा संध्याकाळी सातच्या दरम्यान क्रॅश झालं होतं. तुमचं अॅप अपडेट करा, लॉग इन करा असे मेसेज युजर्सना येत होते. त्यामुळे वैतागलेल्या युजर्सनी X वर पोस्ट करण्यास सुरुवात केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या T20 सामन्याचा थरार पाहताना आम्हाला अडचणी येत आहेत, आम्हाला सामना पाहताच येत नाहीये अशा तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. JioCineam App काम करत नाही लवकर तुमच्या टेक्निकल टीमला कळवा असंही काहींनी सांगितलं. तर अनेक युजर्सनी मीम्स शेअर केले आहेत.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

अनेकांना जिओ सिनेमा सुरु होण्यात एररही दाखवले गेले. आमच्याकडे खूपदा ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मागितला जातो आहे. जीओ सिनेमा काम करत नाही अशी तक्रारही अनेकांनी केली. तर अनेकांनी विविध मीम्स शेअर करत #JioCinema असं पोस्ट करत खिल्ली उडवली.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० सामन्यांची मालिका सुरू झाली. दोन्ही संघ युवा खेळाडूंसह क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील. डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ पहिल्या टी-२० सामन्यासाठी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळलेले बहुतांश खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत. अशा स्थितीत युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करून टीम इंडियातील आपला दावा मजबूत करण्याची संधी आहे.