वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ वर्ल्डकप (ICC Under 19 World Cup 2022) खेळवला जात आहे. भारत आणि बांगलादेश दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा मान राखत बांगलादेशला ३७.१ षटकात १११ धावांवर ऑलआऊट केले. आता भारताकडे हा सामना जिंकून २०२० मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतील बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. बांगलादेशने २०२० मध्ये भारतालाच नमवून जेतेपदावर नाव कोरले होते. आता भारताने हा सामना जिंकला तर सेमीफायनलमध्ये त्यांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचा डाव

महफिझुल इस्लाम आणि इफ्तेखार हुसेन यांनी बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. पण सांघिक तिसऱ्या धावावर बांगलादेशला पहिला धक्का बसला. रवी कुमारने महफिझुलचा (२) त्रिफळा उडवला. त्यानंतर रवीनेच दुसरा सलामीवीर इफ्तेखार हुसेन (१) आणि त्यानंतर आलेल्या प्रांतिक नवरोजला (७) बाद करत बांगलादेशची अवस्था खिळखिळी केली. संघाच्या ५६ धावा फलकावर असताना बांगलादेशने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर एसएम महरोबने ३० धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. अखेर राजवर्धन हंगरगेकरने तंजीम हसन साकिबला झेलबाद करत बांगलादेशचा डाव १११ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून रवी कुमारने १४ धावांत ३, विकी ओसवालने २५ धावांत २ बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : “मला सचिनची दया येते, कारण…”, वाचा असं का म्हणाला शोएब अख्तर?

दोन्ही संघांची Playing 11

भारत : अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), राज बावा, कौशल तांबे, सिद्धार्थ यादव, दिनेश बाना (यष्टीरक्षक), विकी ओसवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार.

बांगलादेश : महफिझुल इस्लाम, इफ्तेखार हुसेन, प्रांतिक नवरोज नबिल, आइच मोल्ला, मोहम्मद फहीम (यष्टीरक्षक), आरिफुल इस्लाम, एसएम महरोब, रकीबुल हसन (कर्णधार), आशिकुर जमान, तंजीम हसन साकिब, रिपन मोंडोल.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs bangladesh icc u19 world cup 2022 quarter final inning update adn
First published on: 29-01-2022 at 21:59 IST