हैदराबाद : गुणतालिकेत तळाशी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये लयीत असलेल्या सनरायजर्स  हैदराबादचा सामना करेल, तेव्हा त्यांचा प्रयत्न विजयी कामगिरी करण्याचा राहील. यंदाच्या हंगामात हैदराबादच्या फलंदाजांनी आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा फायदा संघालाही झाला आहे. हैदराबाद संघ सात सामन्यांत पाच विजय नोंदवत गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, बंगळूरुच्या संघाला आठ सामन्यांत केवळ एकच विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे हैदराबादविरुद्ध कामगिरी उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. हैदराबाद संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यातच फलंदाजांसह त्यांचे गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे बंगळूरुसाठी हैदराबादविरुद्धचे आव्हान सोपे नसेल.

क्लासन, अभिषेकवर नजर

हैदराबादकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिषेक शर्मानेही हेडला चांगली साथ दिली आहे. हेन्रिक क्लासननेही या हंगामात चांगली फलंदाजी केली आहे. फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारल्याने गोलंदाजांनाही मदत मिळत आहे. कर्णधार पॅट कमिन्स, टी. नटराजन, मयांक मरकडे यांनीही चमक दाखवली आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
Virat Kohli Helped Will Jacks to Find Rhythm GT vs RCB IPL 2024
IPL 2024: विराटमुळेच विल जॅक्स करू शकला वेगवान शतक, जॅक्सने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा >>> VIDEO : “महागडा सलमान खान” आयपीएलदरम्यान युजवेंद्र चहलचा ‘राधे भाई’ अवतार पाहून तुम्हीही हसून व्हाल लोटपोट

डय़ुप्लेसिस, कार्तिकवर मदार

बंगळूरुच्या फलंदाजांनी या हंगामात चमक दाखवली आहे. विराट कोहली या हंगामात आतापर्यंत ३७९ धावा करत सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मात्र, त्याच्या कामगिरीचा फायदा संघाला झालेला दिसत नाही. कर्णधार फॅफ डय़ुप्लेसिस व यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कोहलीला चांगले सहकार्य केले आहे. मात्र, इतर फलंदाजांनी निराशा केली. यश दयाल हा त्यांचा यशस्वी गोलंदाज असून त्याने सात गडी मिळवले आहेत. संघाला या सामन्यात चांगली कामगिरी करायची झाल्यास त्यांच्या गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल.

वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.