India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांचाहतील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. यादरम्यान हॅरी ब्रुकने दमदार शतकी खेळी केली.

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. चांगली सुरुवात मिळाली की मोठी खेळी कशी करायची हे हॅरी ब्रुकला चांगलच माहित आहे. हॅरी ब्रुक ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंडचा संघ विजयापासून खूप दूर होता. त्यामुळे ब्रुकने काही आक्रमक फटके मारले. भारतीय गोलंदाजांनी त्याला शॉर्ट चेंडू टाकून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ब्रुक मोठे फटके मारण्याच्या तयारीत होता. त्यामुळे गिलने डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक उभा केला.

एक विकेट घेऊन बाहेर गेलेला मोहम्मद सिराज नुकताच मैदानात परतला होता. त्यावेळी तो डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर ब्रुकने मोठा फटका मारला. हा चेंडू मोहम्मद सिराजच्या हातात गेला. त्याने सीमारेषेवर झेल घेतला. पण झेल घेत असताना त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला. त्यामुळे ब्रुकला जीवदान मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यावेळी सिराजने त्याचा झेल सोडला त्यावेळी तो अवघ्या १९ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर ब्रुकने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ९१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याने जो रूटसोबत मिळून शतकी भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला. इंग्लंडकडून धावांचा पाठलाग करताना जॅक क्रॉउली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ५० धावा जोडल्या. क्रॉउलीने १४ तर डकेटने ५४ धावांची खेळी केली. ओली पोपने २७, हॅरी ब्रुकने १११ धावांची खेळी केली. दुसऱ्या सत्राच्या समाप्तीपर्यंत इंग्लंडने ४ गडी बाद ३१७ धावा केल्या आहेत. इंग्लडला विजयासाठी ५७ धावांची गरज आहे.